शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

'भारताचे शस्त्रागार अंडी देण्यासाठी नाहीय, प्रत्युत्तर द्या'; काँग्रेस खासदाराचे मोदींना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 2:42 PM

मोदी सरकारने चीनसोबतच्या तणावावर बरीच वक्तव्ये केली आहेत. तरीही लडाख सीमेवर तणाव आहे. चीनची घुसखोरी संपायचे नाव घेत नाहीय. सामान्य माणसांच्या मनामध्ये यावरून अस्वस्थता असल्याचे अधीर रंजन चौधरी म्हणाले.

नवी दिल्ली : दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेल्या आणीबाणीला 45 वर्षे झाल्याने भाजपाचे नेते आक्रमक झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांनीही टीका केली आहे. अशावेळी काँग्रेसने पुन्हा चीनवादाकडे लक्ष वेधण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी चीनला भारत घाबरणार नसल्याचे म्हणत चीनला त्यांना समजणाऱ्या भाषेत उत्तर देण्याचे आव्हान दिले आहे. 

चौधरी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये ही वक्तव्ये केली आहेत. चीनला जी भाषा समजते, तीच भाषा आपण बोलायला हवी. आपले शस्त्रागार अंडी देण्यासाठी नाहीत, अशी धमकी त्यांनी दिली आहे. मोदी सरकारने चीनसोबतच्या तणावावर बरीच वक्तव्ये केली आहेत. तरीही लडाख सीमेवर तणाव आहे. चीनची घुसखोरी संपायचे नाव घेत नाहीय. सामान्य माणसांच्या मनामध्ये यावरून अस्वस्थता असल्याचे ते म्हणाले.

भारताचे जवान चिनी लष्कराला माघारी पाठविण्यासाठी सक्षम आहेत. सरकार रणनीतीतून प्रकरण सोडवित आहे. आम्हाला यावर काही समस्या नाही. मात्र, आता परिस्थिती बिघडत चालली आहे. चीन आम्हाला घाबरवत आहे, पण आम्ही घाबरणारे नाही. आम्ही अंडी देण्यासाठी एवढे मोठे शस्त्रागार बनविलेले नाहीय, अशी धमकी चौधरी यांनी दिली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोजी यांनी जेव्हा संसदेचे कामकाज सुरु होईल तेव्हा देशाला संबोधित करावे आणि सध्याच्या परिस्थितीबद्दल सांगावे. देश पंतप्रधानांसोबत उभा आहे. आपल्या शूर जवानांसोबत उभा आहे. चीनने लडाख ते अरुणाचलप्रदेशपर्यंत घुसखोरी केली आहे. ही मोठी चिंतेची बाब आहे, असे सांगत मोदींना आव्हान दिले आहे. 

युद्धाची तयारी?पेंगाँग सरोवर, गलवान खोरे आणि पूर्व लडाखमधील संवेदनशील भागात चीनने आपल्या सैनिकांची संख्या वाढवली आहे. तसेच भारताच्या तीव्र विरोधानंतरही पॉईंट-१४ जवळ चीनने पुन्हा एकदा बांधकाम केले आहे. मात्र या वृत्तानुसार सर्वात चिंताजनक बाब म्हणजे अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड आणि सिक्कीम या राज्यांना लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनच्या सैन्याने मोठ्या प्रमाणात सैनिक, दारुगोळा आणि शस्त्रास्त्रांचे प्रमाण वाढवले आहे.  

अन्य महत्वाच्य़ा बातम्या...

सोन्याला 'ऐतिहासिक' झळाळी, तोळ्याचा दर 50 हजार पार; दोन वर्षांत होईल 'चमत्कार'

बाबो! तब्बल 841 किमीच्या स्पीडने महिलेने कार पळवली; मृत्यूनंतर गिनिज बुकात नोंद

बहिष्काराचा धसका! Xiaomi ने दालनांवरील लोगो झाकले; 'Made in India' लिहिले

Coronil: रामदेव बाबांच्या कोरोनिल औषधावर ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

Unlock1.0 घाम फोडणार! डिझेल पहिल्यांदाच 80 पार; महागाई वाढणार

न भूतो! पहिल्यांदाच पेट्रोलपेक्षा डिझेल महागले; राजधानीत विक्रम

CoronaVirus बनारसी साड्यांचे कारागीर बनवणार कोविड योद्ध्यांसाठी सुरक्षा कवच!

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीchinaचीनcongressकाँग्रेसIndian Armyभारतीय जवान