शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

रिव्हर्स स्विंगवर कसा षटकार ठोकायचा हे भारतीयांना माहीत आहे, मोदींचा इम्रानला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 11:12 PM

नरेंद्र मोदींचा विजय झाल्यास भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा शांतता चर्चा सुरू होईल, असे वक्तव्य करणाऱ्या इम्रान खान यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

 नवी दिल्ली - भारतात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींचा विजय झाल्यास भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा शांतता चर्चा सुरू होईल, असे वक्तव्य करणाऱ्या इम्रान खान यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.इम्रान खानने टाकलेल्या रिव्हर्स स्विंगवर कसा षटकार ठोकायचा हे भारीतायांना चांगलेच माहित आहे, असा टोला मोदींनी लगावला. नवभारत टाइम्स ऑनलाइनला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की,'' इम्रान खान रिव्हर्स स्विंग टाकून भारतातील लोकसभा निवडणूक प्रभावित करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र रिव्हर्स स्विंगवर कसा षटकार ठोकायचा हे भारीतायांना चांगलेच माहीत आहे. पाकिस्तानमध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांनी मोदी नावाचा जोरदार वापर केला होता. मोदी का जो यार है, वो गद्दार हे असा नारा देत त्यांनी निवडणूक जिंकली होती.'' असा टोलाही मोदींनी इम्रान खानला लगावला.  पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यास भारत आणि पाकिस्तानमध्ये शांततेवर चर्चा होण्याची शक्यता आहे असे म्हटले होते. तसेच त्यांनी काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास चर्चा होणं अशक्य असल्याचंही मत यावेळी व्यक्त केले होते. राजकीय पक्षांकडून टीका होईल या भीतीने काँग्रेस शांततेवर चर्चा करणार नाही असे इम्रान खान यांनी म्हटले होते. यासोबतच इम्रान खान यांनी एक निवडणुकीआधीचे आणि एक निवडणुकीनंतरचे असे दोन नरेंद्र मोदी पाहायला मिळणार असल्याचे म्हटले होते.पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथे एअर स्ट्राइक करत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते.  एअर स्ट्राइकनंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी हवाई दलाने भारताच्या हद्दीत घुसून लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हल्ला परतवून लावण्यास सज्ज असलेल्या भारतीय लढाऊ विमानांनी हा हल्ला परतवून लावला होता. पण त्यावेळी उडालेल्या हवाई चकमकीत पाकिस्तानचे एफ-16 विमान पाडताना अपघात होऊन भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे पाकिस्तानच्या तावडीत सापडले होते. त्यानंतर जिनिव्हा करारातील तरतुदींनुसार पाकिस्तानने त्यांची मुक्तता केली होती. या सर्व घडामोडींनंतर आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास शांततेच्या चर्चेला प्राधान्य दिलं जाईल असे म्हटल्याने आश्चर्य व्यक्त केले गेले होते.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीImran Khanइम्रान खानIndiaभारतPakistanपाकिस्तानLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक