CoronaVirus News: रेल्वेकडून ३० जूनपर्यंतची सर्व तिकिटं रद्द; विशेष गाड्या सुरू राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 10:56 AM2020-05-14T10:56:13+5:302020-05-14T11:14:12+5:30

CoronaVirus News: रद्द करण्यात आलेल्या तिकिटांचे पैसे रेल्वेकडून परत केले जाणार

Indian Railways cancels all tickets booked to travel on or before June 30th kkg | CoronaVirus News: रेल्वेकडून ३० जूनपर्यंतची सर्व तिकिटं रद्द; विशेष गाड्या सुरू राहणार

CoronaVirus News: रेल्वेकडून ३० जूनपर्यंतची सर्व तिकिटं रद्द; विशेष गाड्या सुरू राहणार

Next

नवी दिल्ली: रेल्वेनं ३० जूनपर्यंतची सर्व तिकिटं रद्द केली आहेत. तिकीटं रद्द करण्यात आलेल्या सर्व प्रवाशांना रेल्वेकडून तिकिटाचे पैसे परत केले जाणार आहेत. मात्र मजुरांसाठी चालवण्यात येत असलेल्या विशेष गाड्या सुरूच राहतील. लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांसाठी सध्या रेल्वेकडून विशेष श्रमिक गाड्या सोडल्या जात आहेत. 




रेल्वे २२ मेपासून मेल, एक्स्प्रेस आणि शताब्दी गाड्या सुरू करण्याच्या विचारात आहे. सध्या देशभरात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या राज्यांमध्ये सोडण्यासाठी रेल्वेनं श्रमिक विशेष गाड्यांसह राजधानी विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. यानुसार शताब्दी विशेष आणि इंटरसिटी विशेष गाड्या चालवल्या जाऊ शकतात. यामुळे मध्यम वर्गाला मोठा दिलासा मिळू शकेल. या गाड्यांमध्ये एसी फर्स्ट क्लासची २० तिकिटं वेटिंगवर असतील. तर एसी सेकंड क्लासमध्ये ५० आणि एसी थर्ड क्लासमध्ये १०० तिकिटं वेटिंगवर असतील. स्लीपर क्लासमध्ये २०० तिकिटं वेटिंगवर असतील.

रेल्वे तिकिटं ऑनलाईनच बुक होणार
या रेल्वे गाड्यांमध्ये वेटिंग तिकिटंदेखील मिळतील. सध्या सुरू असलेल्या राजधानी एक्स्प्रेस ट्रेनमध्ये ही सुविधा उपलब्ध नाही. मात्र तत्काल आणि प्रीमियम तत्कालची सुविधा या ट्रेन्समध्ये उपलब्ध नसतील. या ट्रेन्सच्या तिकिटांचं बुकिंग १५ मेपासून सुरू होऊ शकतं. या तिकिटांचं बुकिंग ऑनलाईन करता येईल. 

आरक्षित तिकीट रद्द केल्यानंतर कसा मिळवाल रिफंड?; जाणून घ्या रेल्वेचे नवे नियम

पीएम केअर्समधून आतापर्यंत किती रुपये खर्च?; मोदी सरकारनं पहिल्यांदाच दिली आकडेवारी

...म्हणून ईडी, सीबीआयसारख्या राजकीय संस्थांचे लॉकडाऊन करा; शिवसेनेची मोठी मागणी

नीरव मोदीने मला मारुन टाकण्याची धमकी दिली; ब्रिटीश कोर्टात ‘त्या’ व्यक्तीचा व्हिडीओ सादर

विधान परिषद उमेदवारीवरुन भाजपात नाराजी वाढली; खडसेंपाठोपाठ ‘या’ नेत्याचा पक्षाला घरचा आहेर

Web Title: Indian Railways cancels all tickets booked to travel on or before June 30th kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.