महत्त्वाची बातमी! रेल्वेकडून 21 गाड्या रद्द; तुम्हीही तिकिट बुक केलंय तर चेक करा ट्रेन नंबर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 06:19 PM2021-05-24T18:19:11+5:302021-05-24T18:27:55+5:30

indian railways : पूर्व मध्य रेल्वेच्यावतीने (East Central Railway) ट्विट करून याबाबत माहिती देण्यात आली आहे.

indian railways cancel 21 trains from 25 may 2021 check full list here | महत्त्वाची बातमी! रेल्वेकडून 21 गाड्या रद्द; तुम्हीही तिकिट बुक केलंय तर चेक करा ट्रेन नंबर

महत्त्वाची बातमी! रेल्वेकडून 21 गाड्या रद्द; तुम्हीही तिकिट बुक केलंय तर चेक करा ट्रेन नंबर

Next
ठळक मुद्देया गाड्या पाटणा, भभुआ, राजेंद्र नगर टर्मिनल, सीलदार, दानापूर, सिकंदराबाद, सहरसा अशा अनेक मार्गांवर चालवल्या जात आहेत.

नवी दिल्ली : जर तुम्ही पुढच्या एक-दोन दिवसांत ट्रेनने प्रवास करण्याची योजना आखत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने (Indian Railways) 21 गाड्या रद्द केल्या आहेत. ही रेल्वे बिहार मार्गावर धावत होती. (indian railways cancel 21 trains from 25 may 2021)

दरम्यान, पुढील आदेशापर्यंत या गाड्या 25 मेपासून रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आज प्रवास करण्यापूर्वी तुमच्या ट्रेनचे स्टेटस काळजीपूर्वक तपासा, जेणेकरून स्टेशनवर पोहोचल्यानंतर आपल्याला त्रास होणार नाही.

पूर्व मध्य रेल्वेच्यावतीने (East Central Railway) ट्विट करून याबाबत माहिती देण्यात आली आहे.  या गाड्या पाटणा, भभुआ, राजेंद्र नगर टर्मिनल, सीलदार, दानापूर, सिकंदराबाद, सहरसा अशा अनेक मार्गांवर चालवल्या जात आहेत.

रेल्वेकडून ट्विट...
पूर्व मध्य रेल्वेने आपल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, प्रवाशांच्या संख्येत सतत होणारी घट आणि कोरोना संक्रमणाचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने काही विशेष गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवास करण्यापूर्वी एकदा या गाड्यांची यादी तपासण्यात यावी.

(Corona Vaccination : ... म्हणून न्यूड क्लबमध्ये उघडले लसीकरण केंद्र!)

25 मेपासून रद्द करण्यात आलेल्या गाड्या...(Train cancel list from 25 may)

>> 03249 पाटणा-भभुआ रोड इंटरसिटी स्पेशल ट्रेन 25 मेपासून पुढील आदेशांपर्यंत रद्द

>> 03250 भभुआ रोड-पाटणा इंटरसिटी स्पेशल ट्रेन 25 मेपासून पुढील आदेशांपर्यंत रद्द

>> 03259 पाटणा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष ट्रेन 26 मेपासून पुढील आदेशांपर्यंत रद्द

>> 03260 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पाटणा विशेष ट्रेन 28 मेपासून पुढील आदेशांपर्यंत रद्द

>> 03253 पाटणा-बनसवाडी विशेष ट्रेन 27 मेपासून पुढील आदेशापर्यंत रद्द

>> 03254 बनासवाडी ते पाटणा विशेष ट्रेन 30 मेपासून पुढील आदेशापर्यंत रद्द

>> 03242 राजेंद्रनगर टर्मिनल-बांका विशेष रेल्वेगाडी 25 मेपासून पुढील आदेशपर्यंत रद्द.

(Corona Vaccination : सरकारचा मोठा निर्णय, आता 18 - 44 वर्षांच्या लोकांना ऑनलाइन नोंदणीशिवाय लस मिळणार)

>> 03241 बांका-राजेंद्रनगर टर्मिनल विशेष ट्रेन 26 मेपासून पुढील आदेशांपर्यंत रद्द

>> 03642 पंडित दीन दयाल उपाध्याय जम्मू-दिलदारनगर पॅसेंजर स्पेशल ट्रेन 25 मेपासून पुढील आदेशापर्यंत रद्द

>> 03641 दिलदारनगर- पंडित दीन दयाल उपाध्याय जं. पॅसेंजर 25 मेपासून पुढील आदेशापर्यंत रद्द

>> 03643 दिलदारनगर-तारीघाट पॅसेंजर विशेष ट्रेन 25 मेपासून पुढील आदेशापर्यंत रद्द

>> 03644 तारीघाट- दिलदारनगर पॅसेंजर स्पेशल ट्रेन 25 मेपासून पुढील आदेशांपर्यंत रद्द

>> 03647 दिलदारनगर- तारिघाट पॅसेंजर स्पेशल ट्रेन 25 मेपासून पुढील आदेशापर्यंत रद्द

>> 03648 तारीघाट- दिलदारनगर पॅसेंजर विशेष ट्रेन 25 मेपासून पुढील आदेशापर्यंत रद्द

या गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.

>> 03169 सियालदह – सहरसा विशेष ट्रेन 25 मेपासून पुढील आदेशापर्यंत रद्द

>> 03170 सहरसा – सियालदह विशेष ट्रेन 26 मेपासून पुढील आदेशापर्यंत रद्द

>> 03163 सियालदह -सहरसा विशेष रेल्वेगाडी 23 मेपासून पुढील आदेशापर्यंत रद्द

>> 03164 सहरसा – सियालदह विशेष गाडी 24 मेपासून पुढील आदेशापर्यंत रद्द

>> 03160- सहरसा-सियालदह विशेष ट्रेन (भाया पूर्णिया) 26 मेपासून पुढील आदेशापर्यंत रद्द

>> 07052- दानापुर सिकंदराबाद 25 मे रोजी रद्द
 

Web Title: indian railways cancel 21 trains from 25 may 2021 check full list here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.