शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
2
Top Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
3
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
4
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
5
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
6
Ashok Kharat : भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा
7
'पीएम किसान'चे २,००० रुपये खात्यात जमा होण्यासाठी 'या' ३ अटी पूर्ण करणे अनिवार्य; मोबाईलवरुनही प्रोसेस होईल
8
अमेरिकेचे F-35 विमान इराणने पाडले! १५ दिवसांत दुसऱ्या फायटर जेटचा गेम; युद्धभूमीवर खळबळ
9
आता इंधनाबरोबरच खतांचं टेन्शनही संपणार! संकट काळात 'खास मित्र' भारताच्या मदतीला, PM मोदींना भेटून दिलं मदतीचं आश्वासन
10
वर्षभरानंतर सतीश भोसले उर्फ 'खोक्या' तुरुंगाबाहेर; मारहाण प्रकरणात न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
11
हृदयद्रावक! गॅस टंचाईमुळे अनेक रेस्टॉरंट्स बंद; काम न मिळाल्याने शेफची आत्महत्या
12
एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... 
13
पाकिस्तानला दुबईचा दणका! १७ एप्रिलपर्यंत २ अब्ज डॉलर्स परत करा; युएईच्या अल्टिमेटमने शाहबाज शरीफ सरकार हादरले
14
आपने केलेल्या कारवाईनंतर पहिल्यांदाच बोलले राघव चड्डा, म्हणाले, ‘’माझ्या मौनाला…” 
15
"होर्मुझमध्ये फक्त आमचेच नाविक मारले गेले..."; ६० देशांच्या बैठकीत भारत स्पष्टच बोलला, दिला मोठा इशारा!
16
सोने-प्लॅटिनमच्या आयातीवर कडक निर्बंध! आता 'लायसन्स'शिवाय इंपोर्ट अशक्य; दागिन्यांच्या किमती वाढणार?
17
भारत-पाकिस्तानच्या पडद्याआड चर्चा सुरू! 'ट्रॅक-2' बैठकीत दोन्ही देश आमनेसामने, कारण काय...
18
Numerology: तुमचा स्वभाव 'बोल्ड' आहे की लाजाळू? जन्मतारखेनुसार ओळखा बलस्थान,व्यक्तिमत्त्वाला द्या झळाळी!
19
नाशिकमध्ये हायप्रोफाईल ब्लॅकमेलिंग; जेष्ठ व्यक्तीच्या टॅबमधील 'त्या' अश्लील व्हिडिओसाठी १२ लाखांची खंडणी
20
Ashok Kharat : "कुटुंबात वाईट घटना, मृत्यूची भीती"; खरातने लाखो रुपये उकळलेले, कवडीमोल भावात जमीन खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

अनोखी ट्रेन; ना खिडकी, ना दरवाजा...यात दडलाय कोट्यवधीचा माल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 20:13 IST

Indian Railway: जाणून घ्या भारतीय रेल्वेच्या या ‘बंद डब्यांच्या’ गाडीचे गुपित

Indian Railway: भारतात विविध प्रकारच्या रेल्वे पाहायला मिळतात. प्रवासी रेल्वे असो वा मालगाडी, यातही अनेक प्रकार आहेत. प्रवासी रेल्वेचे डब्बे आणि मालगाडी पाहता क्षणी ओळखू येतात. मात्र, आम्ही तुम्हाला अशा एका रेल्वेबद्दल सांगणार आहोत, जी दिसायला प्रवासी ट्रेनसारखी दिसते, पण प्रत्यक्षात मालगाडी असून, सामान्य ट्रेनपेक्षा अतिशय वेगळी आहे. विशेष म्हणजे, या गाडीच्या डब्यांना ना खिडक्या असतात, ना दरवाजे. 

बंद डब्ब्यांची ट्रेन...

ही ‘बंद डब्यांची’ ट्रेन पाहून अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, ही ट्रेन नेमकी कशासाठी असते? अनेकांना वाटते की या ट्रेनमधून लष्करी साहित्य किंवा एखादा गुप्त माल वाहून नेला जात असावा. मात्र, प्रत्यक्षात यामागचे कारण अगदी वेगळे आणि रंजक आहे. भारतीय रेल्वेच्या भाषेत या गाड्यांना NMG (New Modified Goods) ट्रेन असे म्हटले जाते.

काय आहे NMG ट्रेन?

NMG म्हणजे ‘न्यू मॉडिफाइड गुड्स’ ट्रेन. ही संकल्पना म्हणजे जुने, वापरातून बाद झालेले प्रवासी डबे पुन्हा वापरण्याचा रेल्वेचा हुशार मार्ग. जे प्रवासी डबे त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचतात आणि प्रवाशांसाठी सुरक्षित राहत नाहीत, ते थेट भंगारात टाकण्याऐवजी रेल्वे त्यांचे मालवाहू डब्यांमध्ये रूपांतर करते.

5 ते 10 वर्षांसाठी नव्याने वापर

एका जुन्या प्रवासी डब्याचे NMG डब्यात रूपांतर केल्यानंतर तो डबा पुढील 5 ते 10 वर्षे मालवाहतुकीसाठी वापरला जातो. या प्रक्रियेत आतल्या सर्व सीट्स, पंखे, लाईट्स काढून टाकल्या जातात. आत जास्तीत जास्त मोकळी जागा सामान ठेवण्यासाठी तयार केली जाते. यामुळे एक साधा प्रवासी डबा पूर्णपणे मालवाहू डब्यात बदलतो.

खिडक्या आणि दरवाजे बंद का असतात?

या ट्रेनच्या डब्यांना लोखंडी पट्ट्या लावून खिडक्या व दरवाजे पूर्णपणे बंद केलेले असतात. यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे सुरक्षा. NMG ट्रेनचा वापर प्रामुख्याने नवीन कार, मिनी ट्रक, ट्रॅक्टर आणि जीपसारखी महागडी वाहने एक शहरातून दुसऱ्या शहरात वाहून नेण्यासाठी केला जातो. खिडक्या बंद असल्यामुळे आतल्या माल सुरक्षित राहतो, चोरी किंवा छेडछाड करता येत नाही.

मागे मोठा दरवाजा, आत सुरक्षित गोदाम

NMG डब्याच्या मागील बाजूस एक मोठा, मजबूत दरवाजा बसवला जातो, ज्यामुळे वाहन चढवणे आणि उतरवणे सोपे जाते. तसेच, डबा अधिक मजबूत करण्यासाठी अतिरिक्त लोखंडी पट्ट्या बसवण्यात येतात. त्यामुळे हा डबा चालते-फिरते सुरक्षित गोदाम बनतो.

रेल्वेचा खर्च वाचवणारा फॉर्म्युला

या संकल्पनेमुळे जुने डबे उपयोगात येतात, रेल्वेचा खर्च कमी होतो आणि मालवाहतूक अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम होते. हे सर्व भारतीय रेल्वे च्या स्मार्ट व्यवस्थापनाचे उदाहरण मानले जाते.

English
हिंदी सारांश
Web Title : Unique Train: No Windows, No Doors, Carries Crores Worth Goods

Web Summary : Indian Railways uses NMG trains, converted from old passenger cars, to transport vehicles. These trains lack windows and doors for security. This innovative approach saves costs and ensures safe transport of valuable goods.
टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेJara hatkeजरा हटके