आधुनिक तंत्रज्ञान, पूर्णपणे मेड इन इंडिया; भारतीय नौदलात ‘INS माहे’ची धमाकेदार एन्ट्री...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 17:50 IST2025-11-24T17:48:56+5:302025-11-24T17:50:13+5:30
पुढील 4-5 वर्षांत आणखी 7 नौका नौदलात दाखल होणार!

आधुनिक तंत्रज्ञान, पूर्णपणे मेड इन इंडिया; भारतीय नौदलात ‘INS माहे’ची धमाकेदार एन्ट्री...
Indian Navy: स्वदेशी बनावटीची युद्धनौका INS माहे सोमवारी भारतीय नौदलात सामील झाली. कोचीन शिपयार्ड लिमिटेडने तयार केलेली ही युद्धनौका ‘माहे-क्लास’ सीरिजमधील पहिलीच नौका असून, भारताच्या समुद्री सुरक्षेला आणखी मजबूत करणार आहे. शत्रुच्या पाणबुड्यांचा शोध घेऊन त्यांना नष्ट करण्याची क्षमता असलेली ही वेगवान नौका ‘आत्मनिर्भर भारत’चे एक महत्त्वपूर्ण प्रतीक आहे.
कमीशनिंग सोहळ्यात जनरल उपेंद्र द्विवेदी उपस्थित
या युद्ध नौकेच्या कमीशनिंग सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहिलेल्या जनरल उपेंद्र द्विवेदी म्हणाले की, आयएनएस माहे ही फक्त एक नौका नाही, तर स्वदेशी तंत्रज्ञान आणि नौदल क्षमतेचा नवा अध्याय आहे. माहे-क्लास मालिकेत एकूण आठ युद्धनौका तयार केल्या जात आहेत आणि त्यातील पहिली नौका आज ताफ्यात दाखल झाली आहे.
पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित
द्विवेदी यांनी सांगितले की, आयएनएस माहे भारताच्या समुद्री युद्धक्षमता, स्वदेशी डिझाइन, प्रगत तंत्रज्ञान आणि उत्पादन कौशल्याचा मजबूत पुरावा आहे. नौकेत बसवलेले स्टील, प्रणाली, इलेक्ट्रॉनिक्स आणि शस्त्रसामग्री सर्व भारतीय आहेत.
‘छोटी पण अत्यंत घातक’ नौका: आयएनएस माहेची मुख्य वैशिष्ट्ये
लांबी: 77 मीटर
वजन: 900 टन
वेग: 25 नॉट (सुमारे 46 किमी/तास)
स्पेशलिटी: अतिशय कमी आवाज येतो, ज्यामुळे शत्रुला नौकेची हालचाल कळणे कठीण
हल्ल्याची क्षमता
प्रगत सोनार प्रणालीद्वारे पाणबुड्यांचा अचूक शोध
टॉरपीडो आणि रॉकेट प्रणालीद्वारे हल्ला
कमी खोलीच्या पाण्यात दीर्घकाळ ऑपरेशन करण्याची क्षमता
अपडेटेड सेन्सर्स, कम्युनिकेशन सिस्टम आणि कंट्रोल मशीनरी
भूमिका आणि जबाबदाऱ्या
किनारपट्टीच्या क्षेत्रात सतत गस्त करणे
पाण्याखालील धोके शोधून आणि नष्ट करणे
भारताच्या महत्त्वाच्या समुद्री व्यापारमार्गांचे संरक्षण
बंदरांच्या सुरक्षेत महत्त्वाची भूमिका
आत्मनिर्भर भारताचा नवा अध्याय
पूर्वी अशा क्षमतेच्या नौका परदेशातून मागवाव्या लागत होत्या, परंतु आता त्या भारतातच डिझाइन आणि तयार केल्या जात आहेत. पुढील 4-5 वर्षांत उर्वरित 7 नौका देखील नौदलात दाखल होणार आहेत.