शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

रामदेव बाबांमुळे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन अडचणीत; कोरोनिल लाँचवर 'आयएमए'ने मागितलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 4:10 PM

Baba Ramdev on Coronil : पतंजलीच्या कोरोनिल या औषधाला WHO चं सर्टिफिकेट मिळाल्याच्या दाव्यावर IMA नं नोंदवला आक्षेप

ठळक मुद्देडॉ. हर्षवर्धन यांच्या सहभागावर IMA नं नोंदवला आक्षेपIMA नं मागितलं स्पष्टीकरण

कोरोना विषाणू पुन्हा स्ट्रेन बदलत असल्यामुळे सध्या कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी वापरात असलेली औषधं निष्क्रीय ठरतील का अशी भीती सगळ्यांमध्येच आहे. त्याच योगगुरू बाबा रामदेव यांनी कोरोनावर रामबाण उपाय शोधल्याचा दावा केला होता. त्यांनी कोरोना संक्रमण रोखण्यासाठी आणखी एक औषध लाँच केले होते.  दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमधील एका कार्यक्रमात रामदेवबाबांनी ही घोषणा केली होती. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरीदेखील उपस्थित होते. यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशननं आश्चर्य व्यक्त केलं होतं.इंडियन मेडिकल असोसिएशननं सोमवारी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना बाबा रामदेव यांच्या पतंजलीचं कोरोनिल हे औषध लाँच केल्याबद्दल स्पष्टीकरण मागितलं आहे. आयएमएनं सोमवारी एक प्रेस रिलिज जारी करत डॉ. हर्षवर्धन यांना अनेक सवालही केले आहे. आयएमएने जारी केलेल्या निवेदनात केंद्रीय आरोग्यमंत्र्यावरही भारतीय वैद्यकीय परिषदेच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे."नियमानुसार कोणतेही डॉक्टर कोणतंही औषध प्रमोट करू शकत नाही. परंतु केंद्रीय आरोग्यमंत्री हे एक डॉक्टर आहेत, त्यांच्याद्वारे औषध प्रमोट करणं आश्चर्य आहे," असंही निवेदनाद्वारे म्हटलं आहे. औषध लाँच केल्यानंतर बाबा रामदेव यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी आपल्या संस्थेद्वारे तयाक करण्यात आलेलं कोरोनिलशी निगडीत दस्तऐवज आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित केल्याचं म्हटलं हतं. तसंच काही वाहिन्यांना दिलेल्या मुलाखतींमध्ये त्यांनी या औषधाला जागतिक आरोग्य संघटना आणि जगातील १५४ देशांची मान्यता मिळाल्याचंही म्हटलं होतं. परंतु जागतिक आरोग्य संघटनेद्वारे याचं खंडन करण्यात आलं. यानंतर आरोग्य मंत्र्यांच्या उपस्थितीवरून आयएनएनं प्रश्न उपस्थित केले होते. आचार्य बाळकृष्ण यांनी दिलं स्पष्टीकरणयानंतर आचार्य बाळकृष्ण यांच्याकडू स्पष्टीकरण देण्यात आलं होतं. जागतिक आरोग्य संघटनेनं या औषधाला स्वीकारलं किंवा नाकारलही नाहीये. डब्ल्यूएचओ जगभरातील लोकांसाठी एक चांगले, आरोग्यदायी भविष्य घडविण्यासाठी कार्य करते, असं ते म्हणाले होते. 

टॅग्स :patanjaliपतंजलीBaba Ramdevरामदेव बाबाcorona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना