भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई; बांगलादेशाच्या तीन नौका जप्त, 79 जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 12:29 IST2025-11-19T12:27:46+5:302025-11-19T12:29:03+5:30
पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांना मरीन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई; बांगलादेशाच्या तीन नौका जप्त, 79 जणांना अटक
कोलकाता : भारतीय तटरक्षक दलाने भारतीय विशेष आर्थिक क्षेत्रात (EEZ) अवैध मासेमारी करणाऱ्या बांगलादेशच्या तीन मच्छीमार नौका जप्त करुन 79 जणांना अटक केली आहे. तटरक्षक जहाजांनी उत्तर बंगालच्या उपसागरात नियमित गस्तीदरम्यान ही कारवाई केल्याचे अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले.
अवैध मासेमारीचा आरोप
तटरक्षक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पकडलेल्या सर्व बांग्लादेशी नौका भारतीय विशेष आर्थिक क्षेत्रात बेकायदेशीररीत्या मासेमारी करताना आढळल्या. ही कृती भारतीय समुद्री क्षेत्र (विदेशी जहाजांद्वारे मासेमारीचे विनियमन) अधिनियम, 1981 चे सरळ उल्लंघन आहे. नियमित समुद्री गस्तीदरम्यान भारतीय तटरक्षक जहाजांच्या रडारवर या नौका आल्या आणि त्यानंतर त्यांना तत्काळ रोखण्यात आले.
Kolkata, West Bengal: Commander, Coast Guard Region (North East), Inspector General Iqbal Singh Chauhan says, "This region oversees the coastal areas of Odisha and West Bengal. Our responsibility lies within India’s maritime zones, and I am accountable for safety and security in… pic.twitter.com/XBz6uF5wSp
— IANS (@ians_india) November 18, 2025
तपासात काय समोर आले?
तटरक्षक दलाने सांगितले की, तपासादरम्यान कोणत्याही नौकेवरील कर्मचाऱ्याकडे भारतीय जलक्षेत्रात मासेमारी करण्याचा वैध परवाना आढळला नाही. नौकांची तपासणी केल्यानंतर ताज्या मासळीचा साठा आणि मासेमारीचे उपकरण मोठ्या प्रमाणात मिळाले, ज्यावरून बेकायदेशीर मासेमारीचे स्पष्ट पुरावे मिळाले.
कारवाईत तीन नौका जप्त करण्यात आल्या, तर 79 जणांना अटक करण्यात आले. सर्वांना तटरक्षक जहाजांद्वारे पश्चिम बंगालच्या फ्रेजरगंज बंदरावर आणण्यात आले. आता पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांना मरीन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
@IndiaCoastGuard apprehended three #Bangladeshi fishing boats alongwith 79 crew for illegal fishing inside the #Indian EEZ on 15-16 Nov 25, operating without mandatory permits in #Indian waters. All vessels and crew were handed over to the #WestBengal Marine Police, #Frazerganj… pic.twitter.com/KyvQ3Ampsr
— Indian Coast Guard (@IndiaCoastGuard) November 18, 2025
समुद्री सुरक्षेसाठी महत्त्वाचे पाऊल
गेल्या काही महिन्यांत परदेशी नौकांकडून भारतीय जलक्षेत्रात घुसखोरी आणि अवैध मासेमारीच्या घटनांत वाढ होत आहे. त्यामुळे ही कारवाई समुद्री सुरक्षा आणि संसाधनांचे संरक्षण यासाठी धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाची आणि प्रभावी मानली जात आहे.