पाकिस्तानी गर्लफ्रेंडला भेटणं भारतीय बॉयफ्रेंडच्या अंगाशी आलं! तुरुंगात कैद होऊन आता म्हणतोय...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 13:02 IST2025-05-15T13:00:49+5:302025-05-15T13:02:51+5:30
उत्तर प्रदेशातील अलीगढ येथे राहणारा बादल बाबू, सना राणी या पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडला. तिला भेटण्यासाठी तो पाकिस्तानलाही पोहोचला.

पाकिस्तानी गर्लफ्रेंडला भेटणं भारतीय बॉयफ्रेंडच्या अंगाशी आलं! तुरुंगात कैद होऊन आता म्हणतोय...
भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध नेहमीच तणावपूर्ण राहिले आहेत. यातच आता उत्तर प्रदेशच्या एका युवकाला पाकिस्तानच्या तुरुंगात शिक्षा भोगायला लागत असल्याचे प्रकरण समोर आले आहे. उत्तर प्रदेशातील अलीगढ येथे राहणारा बादल बाबू, सना राणी या पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडला. तिला भेटण्यासाठी तो पाकिस्तानलाही पोहोचला. पण त्याच्याकडे कोणतीच वैध कागदपत्रे नव्हती, त्यामुळे पाकिस्तानी पोलिसांनी त्याला अटक केली. तेव्हापासून गेले चार महिने बादल पाकिस्तानच्या तुरुंगात कैद आहे. आता या प्रकरणात पाकिस्तानच्या एका वकिलाने बादलला तुरुंगातून लवकरात लवकर बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे वचन त्याच्या कुटुंबाला दिले आहे.
बादलच्या कुटुंबाने या पाकिस्तानी वकिलाचे आभार मानले आहेत. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील अलिगड जिल्ह्यातील बारला पोलीस स्टेशन परिसरातील नांगला खिटकरी गावातील आहे. खिटकरीचे रहिवाशी असलेल्या कृपाल सिंह यांचा मुलगा बादल बाबू हा सोशल मीडियाद्वारे पाकिस्तानातील मंडी बहाउद्दीन येथील सना राणीच्या प्रेमात पडला होता, बादल सनाच्या प्रेमात इतका बुडाला की, कुटुंबातील सदस्यांना कोणतीही कल्पना न देता तिला भेटण्यासाठी सीमा ओलांडून पाकिस्तानात गेला. मात्र, कोणतीही वैध कागदपत्र नसल्याने पाकिस्तान पोलिसांनी त्याला २७ डिसेंबर २०२४ रोजी सीमा ओलांडताना पकडले आणि तुरुंगात टाकले.
पाकिस्तानी वकील करतोय मदत!
बादलला पाकिस्तानी पोलिसांनी पकडल्याचे कळल्यापासून त्याचे आई-वडील चिंतेत आहेत. पाकिस्तानी वकील फयाज रामे यांनी सोशल मीडियाद्वारे बादल बाबूचे वडील कृपाल सिंह आणि कुटुंबातील सदस्यांशी संपर्क साधला. बादलच्या आईला रडताना पाहून आणि त्यांची आर्थिक परिस्थिती बघता, पाकिस्तानी वकील फयाज रामे यांनी कोणत्याही शुल्काशिवाय बादलचा खटला लढण्याची घोषणा केली. १० जानेवारी २०२५ रोजी फयाज रामे यांनी न्यायालयात बादलची बाजू मांडण्यास सुरुवात केली.
सना नाही, शिक्षा मिळाली!
बादल बाबू याला पाकिस्तानातील मंडी बहाउद्दीनच्या जिल्हा न्यायालयाने एक वर्षाच्या तुरुंगवासासह पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. तर, न्यायालयाने दिलेल्या शिक्षेपैकी बादल बाबूने आधीच चार महिने पाकिस्तानच्या तुरुंगात घालवले आहेत. सनाला भेटायला आलो पण, शिक्षा मिळाली, असं आता बादल म्हणत आहे. चुकीच्या पद्धतीने सीमा पार केल्याप्रकरणी आता त्याच्यावर खटला चालणार आहे.