शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
2
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
3
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
4
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
5
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
6
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
7
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
8
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
9
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
10
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
11
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
12
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
13
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
14
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
15
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
16
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
17
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
18
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
19
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
20
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट

Indian Army New Uniform : भारतीय लष्करानं वीर जवानांचा युनिफॉर्म बदलला; पाहा PHOTO, अशी आहे खासियत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 8:06 PM

युनिफॉर्म परिधान करण्याची पद्धतही बदलणार...

नवी दिल्ली - भारतीय लष्कराने (Indian Army) सैन्य दिनाच्या (Army Day) दिवशी आपला नवा कॉम्बेट यूनिफॉर्म म्हणजेच ऑपरेशन दरम्यान घालण्याचा गणवेश प्रदर्शित केला. पॅराशूट रेजिमेंटचे कमांडोज हा नवा डिजिटल पॅटर्नचा युनिफॉर्म परिधान करून मैदानावर मार्च करताना दिसून आले. महत्वाचे म्हणजे,  एका दशकाहून अधिक काळानंतर लष्कराने आपला युनिफॉर्म अथवा गणवेश बदलला आहे.

अशी आहे युनिफॉर्मची खासियत -या नव्या युनिफॉर्ममध्ये डिजिटल पॅटर्नसोबतच कपड्यातही बदल करण्यात आला आहे. यात 70 टक्के कॉटन आणि केवळ 30 टक्के पॉलिस्टर वापरण्यात आले आहे. यामुळे भारतीय आर्द्र आणि उष्ण हवामानातही सैनिकांसाठी युनिफॉर्म आरामदायक असले. विशेष म्हणजे हा युनिफॉर्म बराच दिवस वापरता येईल आणि सुकायलाही कमी वेळ लागेल. 

जंगल आणि वाळवंटी भाग लक्षात घेत करण्यात आला डिझाइन -हा युनिफॉर्म ऑलिव्ह ग्रीन आणि माताडी रंग एकत्रितपणे वापरून आणि भारतातील जंगल आणि वाळवंटी भागाचा विचार करून तयार करण्यात आला आहे. यामुळे सैनिकांना वेगवेगळ्या भागांत लपण्यास मदत होईल. या युनिफॉर्मचे फॅब्रिक हलके आहे. यामुळे ते अधिकाळ घालणेही आरामदायक असेल. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीचे 8 विद्यार्थी आणि एका प्राध्यापकाच्या गटाने एक वर्षाहून अधिक काळ मेहनत घेतली हा युनिफॉर्म तयार केला आहे. तो टिकाऊ, वजनाला हलका, आरामदायक आणि सर्व भूभागांमध्ये लपण्यास त्याची मदत होईल ही वैशिष्ट्ये लक्षात घेत तो तयार करण्यात आला आहे.

युनिफॉर्म परिधान करण्याची पद्धतही बदलणार -हा नवा युनिफॉर्म परिधान करण्याची पद्धतही बदलेल. सध्या भारतीय लष्कराच्या लढाऊ युनिफॉर्म शर्ट पॅन्टच्या आत खोचला जातो आणि वरून बेल्ट लावला जातो. मात्र, हा युनिफॉर्म काही परदेशातील सैनिकांच्या युनिफॉर्म प्रमाणे शर्ट पॅन्टच्या बाहेर ठेवूनच परिधान केला जाईल. यामुळे सैनिकांना काम करणे सोपे होईल. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानSoldierसैनिक