शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
2
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
3
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
4
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
5
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
6
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
7
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
8
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
9
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
10
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
11
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
12
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
13
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
14
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
15
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
16
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
17
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
18
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
19
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
20
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट

तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाणे हा पाकिस्तानचा नाइलाज, एअरस्ट्राइकवरून जेटलींचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 3:39 PM

 भारतीय हवाई दलाने बालाकोट येथील जैश ए मोहम्मदच्या तळांवर एअर स्ट्राइक करून पुलमावा येथील आत्मघाती हल्ल्याचा बदला घेतला होता.

ठळक मुद्दे भारतीय हवाई दलाने बालाकोट येथील जैश ए मोहम्मदच्या तळांवर एअर स्ट्राइक करून पुलमावा येथील आत्मघाती हल्ल्याचा बदला घेतला हवाई दलाच्या एअरस्ट्राइकवरून भारतात राजकारणही जोरात तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाणे हा पाकिस्तानचा नाइलाज असल्याचा टोला केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी लगावला

नवी दिल्ली -  भारतीय हवाई दलाने बालाकोट येथील जैश ए मोहम्मदच्या तळांवर एअर स्ट्राइक करून पुलमावा येथील आत्मघाती हल्ल्याचा बदला घेतला होता. मात्र हवाई दलाच्या एअरस्ट्राइकवरून भारतात राजकारणही जोरात आहे. तर  पाकिस्तान सरकार आणि तेथील लष्कर  बालाकोटमध्ये काहीच हानी झाली नसल्याचा दावा करत आहे. मात्र तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाणे हा पाकिस्तानचा नाइलाज असल्याचा टोला केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी लगावला आहे. केंद्रीय मंत्री अरुण जेटली एअर स्ट्राइकवर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, ''आम्ही जेव्हा एअर स्ट्राइक केला तेव्हा आम्ही कुणालाच काही सांगितले नाही. पण याची माहिती सर्वप्रथम पाकिस्तानी सैन्यानेच जगजाहीर केली. पाकिस्तान सरकार ऐवजी तेथील सैन्याने एअर स्ट्राइकबाबत माहिती देण्याची दोन कारणे आहेत, एक म्हणजे पाकिस्तानमधील सरकार हे तेथील लष्करच चालवते. तसेच आपल्या हातात देश सुरक्षित आहे असा भ्रम पाकिस्तानी सैन्याने निर्माण करून ठेवलेला आहे. त्यामुळे जर बालाकोटचे सत्य समोर आले तर पाकिस्तानी सैंन्याची नाचक्की होईल. त्यामुळेच बालाकोटचे वास्तव लपवण्यात येत आहे.''पाकिस्तानकडून बालाकोटचे वास्तव का नाकारण्यात येत आहे, याबाबत विचारले असता जेटली यांनी सांगितले की, ''जर पाकिस्तानने बालाकोटमध्ये असलेले दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त झाले आहेत, हे मान्य केले असते तर आंतरराष्ट्रीय समुदायाकडून त्यांना हजार प्रश्न विचारले गेले असते. बालाकोटमध्ये काय चालले होते? कोण मारले गेले आहेत? अशी विचारणा झाल्यावर आमच्याकडे जैश ए मोहम्मदचा तळ होता आणि भारताने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये तो उद्ध्वस्त झाला, असे उत्तर पाकिस्तानने दिले असते का?  त्याशिवाय संयुक्त राष्ट्रांसमोरही त्यांना स्पष्टीकरण द्यावे लागले असते ते वेगळेच. जर आपल्या देशात दहशतवाद्यांचे तळ आहेत हे मान्य केले अजते तर पाकिस्तानला ब्लॅक लिस्टमध्ये जावे लागले असते. त्यामुळेच त्यांनी एवढा दणका बसल्यानंतरही गप्प राहणे पसंत केले.'' दरम्यान, भारतीय हवाई दलाने खैबर पख्तुनख्वा प्रांतामध्ये चढाई केली. तसेच अचूक हल्ला करून दहशतवाद्यांचे तळही उद्ध्वस्त केले. त्याबरोबरच भारत नियंत्रण रेषेची मर्यादा पाळेल, हा भ्रमही मोडीत काढला गेला. आमच्या या धडक कारवाईनंतर जगभरातील कुठल्याही देशाने आमच्या कृतीचा निषेध केलेला नाही. कारण आम्ही निर्दोष लोकांना आणि पाकिस्तानी सैन्याला लक्ष्य न करता दहशतवाद्यांना लक्ष्य केले होते.''असेही अरुण जेटली यांनी स्पष्ट केले.   

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटलीIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकPakistanपाकिस्तानTerrorismदहशतवाद