भारतीय हवाई दलाचे विमान तांबरमजवळ कोसळले; कोर्ट ऑफ इन्क्वायरीचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 16:34 IST2025-11-14T16:34:05+5:302025-11-14T16:34:42+5:30
विमान तांबरम हवाई तळाजवळ एका निर्जन जंगल परिसरात दुपारी २ वाजण्याच्या सुमारास दुर्घटनाग्रस्त झाले.

भारतीय हवाई दलाचे विमान तांबरमजवळ कोसळले; कोर्ट ऑफ इन्क्वायरीचा आदेश
भारतीय हवाई दलाचे एक पीसी-७ पिलाटस बेसिक ट्रेनर विमान शुक्रवारी चेन्नईजवळील तांबरम येथे नियमित प्रशिक्षण मोहिमेदरम्यान कोसळले. विमान तांबरम हवाई तळाजवळ एका निर्जन जंगल परिसरात दुपारी २ वाजण्याच्या सुमारास दुर्घटनाग्रस्त झाले.
सुदैवाने, विमान जमिनीवर कोसळण्यापूर्वीच पायलट सुरक्षितपणे बाहेर पडण्यात यशस्वी झाला. या घटनेत पायलट पूर्णपणे सुरक्षित असून, त्याला कोणतीही दुखापत झाली नाही.
VIDEO | Tamil Nadu: An Air Force training aircraft crashed near Thiruporur in Chengalpattu district. More details are awaited.
— Press Trust of India (@PTI_News) November 14, 2025
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/SPPRXri1mO
भारतीय हवाई दलाने या अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी 'कोर्ट ऑफ इन्क्वायरी'म्हणजेच चौकशी आयोगाचे आदेश दिले आहेत. अपघाताच्या नेमक्या कारणांची चौकशी पूर्ण झाल्यावर पुढील माहिती उपलब्ध होईल. पीसी-७ पिलाटस हे विमान हवाई दलाच्या कॅडेट्सच्या प्राथमिक उड्डाण प्रशिक्षणासाठी वापरले जाते.
One PC-7 Pilatus basic trainer aircraft of the Indian Air Force on a routine training mission crashed near Tambram, Chennai. Pilot safely ejected. A Court of Inquiry to ascertain the cause has been ordered: Indian Air Force
— ANI (@ANI) November 14, 2025