डोकं फिरलंया! फायटर जेट पाडून भारताने लावली पाकची वाट, तरी इशाक दार यांनी थोपटली त्यांच्या वायुदलाची पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 16:02 IST2025-05-16T16:01:50+5:302025-05-16T16:02:17+5:30

Operation Sindoor : भारतीय सैन्याने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं आणि त्यांची पाच विमानं पाडली. यामध्ये २ लढाऊ विमानांचाही समावेश होता.

indian air force destroyed pakistan 5 fighter jet air base Operation Sindoor | डोकं फिरलंया! फायटर जेट पाडून भारताने लावली पाकची वाट, तरी इशाक दार यांनी थोपटली त्यांच्या वायुदलाची पाठ

डोकं फिरलंया! फायटर जेट पाडून भारताने लावली पाकची वाट, तरी इशाक दार यांनी थोपटली त्यांच्या वायुदलाची पाठ

भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळेपाकिस्तानचं खूप मोठं नुकसान झालं आहे, मात्र पाकिस्तान हे अजिबात मान्य करत नाही. भारतीय सैन्याने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं आणि त्यांची पाच विमानं पाडली. यामध्ये २ लढाऊ विमानांचाही समावेश होता. याच दरम्यान पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार त्यांच्या संसदेत हवाई दलाचं खोटं कौतुक करताना दिसले.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तान आणि पीओकेमधील ९ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला होता. त्याने ६ आणि ७ मे रोजी दोन पाकिस्तानी लढाऊ विमानं पाडली. यानंतर ८ आणि ९ मे रोजी ३ विमानं पाडण्यात आली. भारताने पाकिस्तानचे २ जेएफ १७, १ मिराज जेट, १ AWACS आणि १ C-130 पाडले पण पाकिस्तान जगाला खोटं सांगत आहे. 

"ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"

पाकिस्तानी हवाई दलाचं खोटं कौतुक

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी अलिकडेच त्यांच्या संसदेत पाकिस्तानी हवाई दलाचं खोटं कौतुक केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, द टेलिग्राफने पाकिस्तान हवाई दलाचं कौतुक करणारा लेख प्रकाशित केला आहे. मात्र ही बातमी खोटी असल्याचं निष्पन्न झालं. पाकिस्तानच्या द डॉन वृत्तपत्राने त्याची सत्यता पडताळून ती खोटी असल्याचं घोषित केलं होतं. पाकिस्तानने ६ भारतीय विमाने पाडली होती असंही इशाक दार यांनी म्हटलं आहे. 

दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर मोठा हल्ला 

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर मोठा हल्ला केला, परंतु पाकिस्तानी सैन्यानेही त्यात उडी घेतली. गोळीबारात पाकिस्तानी हवाई दलाचे ५ जवान मारले गेले. यामध्ये स्क्वॉड्रन लीडर उस्मान युसूफचाही समावेश होता. पाकिस्तानी लष्कराच्या एका निवृत्त एअर मार्शलनेही नुकसानीचा खुलासा केला. 
 

Web Title: indian air force destroyed pakistan 5 fighter jet air base Operation Sindoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.