शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
6
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
7
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
8
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
9
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
10
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
11
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
12
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
13
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
14
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
15
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
16
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
17
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
18
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
19
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
20
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका

पाकिस्तानातून येणाऱ्या मुस्लिमांनाही देणार भारताचं नागरिकत्व - संरक्षणमंत्री राजनाथ सिंह 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 8:22 AM

भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. येथे कोणावरही धार्मिक अत्याचार होऊ शकत नाही

ठळक मुद्देसीएएमुळे कोणत्याही भारतीयाचं नागरिकत्व जाणार नाही६०० मुस्लिम बांधवांना जे पाकिस्तानातून आलेत त्यांना ५ ते ६ वर्षांत भारताचं नागरिकत्व दिलेभारत हा हिंदू देश नाही. भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे.

नवी दिल्ली - संपूर्ण देशभरात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आंदोलनाचं रान पेटलं आहे. अशातच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मोठं विधान केलं आहे. जर एखादा मुस्लीम पाकिस्तानातून आला तर त्याला नागरिकत्व दिले जाईल. यासाठी कायद्यात तरतूददेखील आहे असं ते म्हणाले. 

निवडणूक प्रचार रॅलीत बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, सरकारने गेल्या ५ ते ६ वर्षात ६०० पाकिस्तानी नागरिकांना भारताचं नागरिकत्व दिलं आहे. तसेच सीएएच्या विरोधामागील आंदोलनात परदेशी शक्तींचा हात असल्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. आम्ही हिंदू-मुस्लिमांच्या जोरावर राजकारण करणारे लोक नाही. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश हे इस्लामी देश आहेत.

पण भारत हा हिंदू देश नाही. भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. येथे कोणावरही धार्मिक अत्याचार होऊ शकत नाही. पाकिस्तानमध्ये बिगर मुस्लीम लोकांवर धार्मिक अत्याचार होतात, म्हणून आम्हाला हा कायदा करण्याची आवश्यकता होती. मग ते हिंदू, बौद्ध, जैन, शीख, ख्रिश्चन आणि पारशी असतील, तिथे त्यांच्यावर धार्मिक अत्याचार केले जात आहे आणि भारतात त्यांना सन्मानाने जीवन जगण्याची इच्छा आहे. मग आपण त्यांना नागरिकत्व देऊ. या कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय विचारपूर्वक घेतला आहे असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. 

नरेंद्र मोदी आणि नथुराम गोडसेची विचारसरणी एकच, राहुल गांधींचा घणाघात

मुस्लिमांनाही नागरिकत्वाची तरतूदमुस्लीम समाजाचा प्रश्न आहे. जर कोणताही मुस्लीम बांधव ज्याला पाकिस्तानातून यायचे असेल, भारतात राहायचे असेल तर त्यांना आमच्या नागरिकत्व कायद्यात तरतूद आहे की त्यांना येथे नागरिकत्व मिळू शकेल. आम्ही आमच्या ६०० मुस्लिम बांधवांना जे पाकिस्तानातून आले आहेत त्यांना ५ ते ६ वर्षांत भारताचं नागरिकत्व दिले आहे. तरीही द्वेष भडकावण्याचा प्रयत्न काही जणांकडून केला जात आहे असा आरोप राजनाथ सिंह यांनी केला. 

परदेशी शक्तींचा हात सीएएमुळे कोणत्याही भारतीयाचं नागरिकत्व जाणार नाही, अशी ग्वाही राजनाथ सिंह यांनी दिली. सीएएच्या विरोधामागील परदेशी शक्तींचा हात असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली. राजनाथ सिंह म्हणाले की, भारतातील एकाही नागरिकाचे नागरिकत्व जाणार नाही. केवळ दिशाभूल केली जात आहे. यामध्ये काही परदेशी शक्तींचा सहभाग आहे. इतिहास द्वेषाच्या शाईने लिहिण्याचा प्रयत्न करू नये असा इशाराही संरक्षणमंत्र्यांनी दिला. 

महत्त्वाच्या बातम्या

Jamia Protest: मोदीजी, 'त्याला' त्याच्या कपड्यांवरुन ओळखा; ओवेसींचा चिमटा

Jamia Protest: शाहीन बाग, खेल खत्म; त्यानं फेसबुकवर दिले होते गोळीबाराचे संकेत

Jamia Firing : आंदोलक विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्याआधी 'तो' होता फेसबुकवर LIVE

'तुम्ही अयोध्येत राम मंदिर बांधा, आम्ही बाबरी मशीद उभारू'

देश तोडण्याची भाषा करणारा शरजील 'प्रेयसी'मुळे फसला जाळ्यात; 'असा' आखला पोलिसांनी प्लॅन

 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहMuslimमुस्लीमHinduहिंदूcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकBJPभाजपाPakistanपाकिस्तानIndiaभारत