शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक संबंधांवर भारत- अमेरिका चर्चा दोन देशांचे अर्थमंत्री भेटले : दहशतवादासाठी वापरल्या जाणाऱ्या पैशाचा ओघ थांबविणार

By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST

नवी दिल्ली: काळ्या पैशाच्या वापरासह दहशतवादी कारवायांसाठी अतिरेकी संघटनांना पुरविल्या जाणाऱ्या निधीचा ओघ (टेरर फंडिंग)थांबविण्यावर भारत आणि अमेरिकेने गुरुवारी चर्चा केली. अमेरिकेचे भारतभेटीवर आलेले अर्थमंत्री जेकब ल्यू आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आर्थिक संबंध बळकट करण्यासंबंधी विविध मुद्यांवर चर्चेत भर दिला.

नवी दिल्ली: काळ्या पैशाच्या वापरासह दहशतवादी कारवायांसाठी अतिरेकी संघटनांना पुरविल्या जाणाऱ्या निधीचा ओघ (टेरर फंडिंग)थांबविण्यावर भारत आणि अमेरिकेने गुरुवारी चर्चा केली. अमेरिकेचे भारतभेटीवर आलेले अर्थमंत्री जेकब ल्यू आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आर्थिक संबंध बळकट करण्यासंबंधी विविध मुद्यांवर चर्चेत भर दिला.
भारत- अमेरिका आर्थिक आणि वित्तीय भागीदारीसंबंधी पाचव्या बैठकीत दोन देशांचे अर्थमंत्री सहभागी झाले. करपद्धती, दीर्घकालीन गुंतवणुकीच्या व्यूहरचेनसह दोन देशांच्या अर्थव्यवस्थेवर विस्तृत चर्चा झाली. दोन देशांतील सूक्ष्म आर्थिक परिस्थितीसह संपूर्ण जगाला भेडसावणाऱ्या दहशतवादाच्या मुद्यावर विशेषत: अतिरेकी संघटनांना पुरविल्या जाणाऱ्या पैशाचा ओघ थांबविण्याबाबत चर्चा केल्याचे जेटली आणि ल्यू यांनी संयुक्त पत्रपरिषदेत सांगितले.
काळा पैशावर(मनी लाँड्रिंग) नियंत्रण आणण्यासाठी जागतिक स्तरावर सहकार्याची गरज लक्षात घेता भारताला विदेशी खाते करपूर्ती कायद्याचा (एफएटीसीए) भाग बनावे यावर अमेरिकेने जोर दिला आहे. संबंधित करारात सहभागी झाल्यास दोन देशांना आपसूकच माहितीचे आदान-प्रदान शक्य होईल.
------------------
सुधारणा प्रक्रियेची प्रशंसा..
नरेंद्र मोदी यांच्या सरकारने अवलंबलेल्या सुधारणा प्रक्रियेबाबत प्रशंसा करतानाच दोन देशांमधील बाजारपेठांची वाढती व्याप्ती पाहता आर्थिक संबंध बळकट करण्यासह दोन देशांचे व्यापार संबंध नव्या उंचीवर नेण्यात अमेरिकेला स्वारस्य असल्याचे ल्यू यांनी स्पष्ट केले. कर वाद निकाली काढण्यासह भारतीय भांडवली बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक वाढवण्यावर अमेरिकेचा भर असेल. गेल्या काही वर्षांमध्ये दोन देशांनी त्या दिशेने लक्षणीय प्रगती केली आहे. दोन देशांचा व्यापार जवळजवळ १०० अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत पोहोचला आहे, असेही ते म्हणाले.