पाक उच्चायुक्तांना भारताने बजावले समन्स

By Admin | Updated: September 7, 2016 16:38 IST2016-09-07T16:38:42+5:302016-09-07T16:38:42+5:30

गौतम बांबवले यांचा कार्यक्रम रद्द झाल्या प्रकरणी बुधवारी भारताने पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांना समन्स बजावले.

India summons summons to Pakistan High Commissioner | पाक उच्चायुक्तांना भारताने बजावले समन्स

पाक उच्चायुक्तांना भारताने बजावले समन्स

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ७ - पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्त गौतम बांबवले यांचा कार्यक्रम रद्द झाल्या प्रकरणी बुधवारी भारताने पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांना समन्स बजावले. गौतम बांबवले यांचा सहभाग असलेला कार्यक्रम कराची चेंबर ऑफ कॉमर्सने मंगळवारी शेवटच्या मिनिटाला रद्द केला. 
 
कार्यक्रमाच्या अर्धातास आधी बांबवले यांना कार्यक्रम रद्द झाल्याची माहिती देण्यात आली. काही आठवडेआधी त्यांनी कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारले होते. कार्यक्रम रद्द करण्याचे आयोजकांनी कारण दिले नाही.
 
पण बांबवले यांच्या वक्तव्यामुळे कार्यक्रम रद्द झाला अशी चर्चा आहे. काश्मीर भारताचा अंतर्गत विषय असून पाकिस्तान त्यात हस्तक्षेप करत आहे असे विधान बांबवले यांनी केले होते. 
 

Web Title: India summons summons to Pakistan High Commissioner