Video - लडाखमध्ये चिनी सैनिकांनी भारतीयांना रोखलं, काँग्रेसचा दावा; मोदींकडे केली 'ही' मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 13:02 IST2024-01-31T13:01:40+5:302024-01-31T13:02:34+5:30
काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचा एक व्हिडिओही देखील ट्विट केला आहे.

Video - लडाखमध्ये चिनी सैनिकांनी भारतीयांना रोखलं, काँग्रेसचा दावा; मोदींकडे केली 'ही' मागणी
लडाखमध्ये चिनी सैनिकांनी भारतीय मेंढपाळांना थांबवलं आणि त्यांच्याशी वाद घातल्याचा दावा काँग्रेस पक्षाने केला आहे. या दाव्यासोबतच काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचा एक व्हिडिओही देखील ट्विट केला आहे, ज्यामध्ये चिनी सैनिक मेंढपाळांशी वाद घालताना आणि त्यांना थांबवताना दिसत आहेत.
चिनी सैनिक लडाखमध्ये भारतीय मेंढपाळांना थांबवून त्यांच्याशी वाद घालत असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. "चीन आपल्या कृत्यांपासून परावृत्त होत नाही. आता लडाखमधून एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये चिनी सैनिक मेंढपाळांना आमच्या जमिनीवर येण्यापासून रोखत आहेत. चिनी सैनिकांचीही मेंढपाळांशी झटापट झाली" असं काँग्रेसने म्हटलं आहे.
चीन अपनी हरकतों से बाज नहीं आ रहा है. अब लद्दाख से एक वीडियो सामने आया है.
— Congress (@INCIndia) January 31, 2024
इस वीडियो में चीन के सैनिक हमारी जमीन पर चरवाहों को जाने से रोक रहे हैं. चीन के सैनिकों की चरवाहों से झड़प भी हुई.
आखिर चीन की हिम्मत कैसे हो रही है? हमारी जमीन पर पैर रखने की इनकी जुर्रत कैसे हुई?
क्या… pic.twitter.com/ibCMXYVIvo
"चीनची हिंमत कशी होत आहे? आमच्या जमिनीवर पाय ठेवण्याची त्यांची हिंमत कशी झाली? पंतप्रधान मोदी यावेळीही चीनला क्लीन चिट देणार आणि कोणीही घुसलं नाही असं म्हणणार का?, सरकारने या नापाक कृत्याबद्दल चीनला कडक संदेश द्यावा" असं ही काँग्रेसने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.