शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 18:22 IST

India-Russia Relation : भारतीय अंतराळ संस्था ISRO आणि रशियन अंतराळ संस्था रोसकॉसमॉस मोठा अंतराळ कार्यक्रम राबवणार आहेत.

India-Russia Relation : भारत आणि रशियामधील मैत्री आता अंतराळात एक नवा इतिहास रचण्यास सज्ज झाली आहे. भारतीय अंतराळ संस्था ISRO आणि रशियन अंतराळ संस्था रोसकॉसमॉस लवकरच एकत्रपणे मोठा अंतराळ कार्यक्रम राबवणार आहेत. या दोन संस्था एकत्र आल्यानंत अमेरिकेच्या NASA ला नक्कीच धक्का बसू शकतो. 

भारताची रशियाला खुली ऑफर भारताने रशियन कंपन्यांना देशातील नाविन्यपूर्ण अंतराळ प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणि भारताच्या मोठ्या बाजारपेठेचा फायदा घेण्यासाठी आमंत्रित केले आहे. ही माहिती रशियातील भारताचे राजदूत विनय कुमार यांनी दिली. राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त भारतीय दूतावासात आयोजित समारंभात बोलताना कुमार म्हणाले की, भारत सरकारने अंतराळ उद्योगात अनुकूल आणि सहयोगी वातावरण निर्माण करण्यासाठी अनेक आकर्षक योजना आणि धोरणे आणली आहेत.

रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

भारत आणि रशियाची दशकांपासूनची मैत्रीविनय कुमार पुढे म्हणाले, भारत आणि रशियामध्ये अंतराळ क्षेत्रात दशकांपासून खोल सहकार्य आहे. १९७५ मध्ये भारताने सोव्हिएत रशियाच्या सहकार्यानेच आपला पहिला उपग्रह 'आर्यभट्ट' प्रक्षेपित केला होता. त्यानंतर १९८४ मध्ये भारतीय वैमानिक राकेश शर्मा यांनी सोयुझ टी-११ अंतराळयानातून अंतराळात प्रवास केला, जो त्या वेळी एक मोठी कामगिरी होती. सध्या गगनयान मानवी अंतराळ मोहिमेसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांवरही दोन्ही देशांमध्ये सहकार्य सुरू आहे.

इस्रो आणि रोसकॉसमॉस जगावर वर्चस्व गाजवणारइस्रोसोबत जवळून काम करणाऱ्या रशियाच्या अंतराळ संस्थेच्या अधिकाऱ्यांनी आणि तज्ञांनीही या कार्यक्रमात भाग घेतला. त्यांनी या भागीदारीचे महत्त्व आणि भविष्यातील शक्यतांवर चर्चा केली. विनाय कुमार यांनी असेही सांगितले की, अंतराळ उद्योग हे एक आधुनिक व्यावसायिक क्षेत्र असले तरी, वैदिक काळापासून भारतीय संस्कृतीत अंतराळाशी संबंधित परंपरा आणि ज्ञान अस्तित्वात आहे. आर्यभट्ट सारख्या प्राचीन विद्वानांनी खगोलीय पिंडांच्या हालचाली आणि मानवी जीवनावर होणाऱ्या परिणामांचा सखोल अभ्यास केला. आज अंतराळ तंत्रज्ञान हे दूरसंचार, नेव्हिगेशन, हवामान अंदाज, आपत्ती व्यवस्थापन आणि दैनंदिन जीवनातील अनेक क्षेत्रांमध्ये आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. भारताच्या अंतराळ कार्यक्रमाने केवळ देशाच्या तांत्रिक प्रगतीत योगदान दिले नाही, तर जागतिक स्तरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे.

टॅग्स :isroइस्रोIndiaभारतrussiaरशियाAmericaअमेरिकाNASAनासा