जागतिक हवामान बदलाच्या संकटाला तोंड देण्यासाठी भारत सज्ज- पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 04:51 PM2021-06-05T16:51:31+5:302021-06-05T16:58:09+5:30

गेल्या सहा ते सात वर्षांमध्ये भारताची रिन्यूएबल एनर्जीची क्षमता ही २५० पटींहून अधिक झाल्याचं नरेंद्र मोदींनी सांगितलं.

India ready to face global climate change crisis: Prime Minister Narendra Modi | जागतिक हवामान बदलाच्या संकटाला तोंड देण्यासाठी भारत सज्ज- पंतप्रधान नरेंद्र मोदी

जागतिक हवामान बदलाच्या संकटाला तोंड देण्यासाठी भारत सज्ज- पंतप्रधान नरेंद्र मोदी

Next

नवी दिल्ली: जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शेतकऱ्यांशी इथेनॉलच्या वापरासंबंधी संवाद साधला. यावेळी जागतिक हवामान बदलाच्या संकटाला तोंड देण्यासाठी भारत सज्ज असून इथेनॉलचा वापर २१ व्या शतकातील भारताची प्राथमिकता असेल, असं नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं. 

नरेंद्र मोदी म्हणाले की, गेल्या सहा ते सात वर्षांमध्ये भारताची रिन्यूएबल एनर्जीची क्षमता ही २५० पटींहून अधिक झाली आहे. सध्या वापरात असलेल्या रिन्यूएबल एनर्जीच्या क्षमतेबाबत भारत जगातील पहिल्या पाच देशांच्या यादीत असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं. गेल्या सहा वर्षाच्या काळात भारताच्या सौर उर्जेची क्षमता ही जवळपास १५ टक्क्यांनी वाढली आहे. 

इथेनॉलच्या वापरावर भारत लक्ष केंद्रीत करत असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, इथेनॉलवर लक्ष केंद्रीत केल्यानं त्याचा फायदा देशातील शेतकऱ्यांना होणार आहे. २०२५ पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रित करायचा संकल्प आपण केला आहे. त्यासाठी एक रोडमॅप जाहीर करण्यात आला आहे.


Web Title: India ready to face global climate change crisis: Prime Minister Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.