शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

कोरोनाबाधित रुग्णांच्या यादीत भारत जगात तिसरा, रुग्णसंख्या 7 लाखांच्या घरात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2020 10:32 AM

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवाडीनुसार गेल्या 24 तासात देशभरात 24,248 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

ठळक मुद्दे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवाडीनुसार गेल्या 24 तासात देशभरात 24,248 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.महाराष्ट्रात रुग्ण बरे होणाऱ्यांची टक्केवारी जवळपास ८ टक्क्यांनी वाढली. परंतु, तमिलनाडू आणि गुजरातमध्ये हा दर २ टक्क्यांपेक्षा काहीसा वाढला आहे.

नवी दिल्ली : देशातील लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6 लाख 97 हजार 413 वर पोहोचली आहे. रविवारी एकाच दिवसात देशात तब्बल 24,248 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे, देशातील रुग्णसंख्येचा आकडा 7 लाखांच्या घरात पोहोचला असून कोरोनामुळे सर्वाधिक बाधित होणाऱ्या देशांच्या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर पुढे आला आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवाडीनुसार गेल्या 24 तासात देशभरात 24,248 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर, 424 रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या 19,693 पर्यंत पोहोचली आहे. देशात गेल्या 4 दिवसात सातत्याने 20 हजारांपेक्षा अधिक रुग्णसंख्या आढळून आल्याने कोरोना आणखीनच चिंताग्रस्त बनत चालला आहे. मात्र, दिलासादायक वृत्त म्हणजे आत्तापर्यंत 4 लाख 24 हजार 433 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कोरोनाचे सगळ्यात जास्त रुग्ण असलेल्या चार राज्यांत कोरोनातून बरे होण्याच्या दरात (रिकव्हरी रेट) दिल्ली सगळ्यात वेगाने प्रगती करत आहे. गेल्या दोन आठवड्यांत दिल्लीत हा दर २७ टक्क्यांनी वाढला आहे. या दरम्यान महाराष्ट्रात रुग्ण बरे होणाऱ्यांची टक्केवारी जवळपास ८ टक्क्यांनी वाढली. परंतु, तमिलनाडू आणि गुजरातमध्ये हा दर २ टक्क्यांपेक्षा काहीसा वाढला आहे.

कोविड 19 च्या सर्वाधिक प्रभावित देशांमध्ये अमेरिका पहिल्या क्रमांकावर असून ब्राझील व रशियानंतर भारत चौथ्या स्थानावर होता. मात्र, गेल्या आठवड्यातील रुग्णवाढीचा वेग वाढल्याने रशियापेक्षा अधिक कोरोनाबाधितांची संख्या भारतात झाली आहे. दरम्यान, वाढती कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेऊन काही राज्यांनी पुन्हा एकदा लॉकडाऊनचे पाऊल उचलल्याचे दिसून येत आहे. कर्नाटक आणि आसाम या राज्यांनी काही जिल्ह्यांत लॉकडाऊन घोषित केले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस