भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. त्यामुळे भारतीय नागरी उड्डाण मंत्रालयाने खबरदारीचा उपाय म्हणून महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानकडून काही मिसाईल आणि ड्रोन हल्ले केले गेले होते. ते निष्क्रिय करण्यात आले, पण भारताने देशातील २४ विमानतळे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारतीय नागरी उड्डाण मंत्रायलयाने मार्गदर्शक नियमावली जारी केली आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाने गुरुवारी रात्रीपर्यंत देशातील २४ विमानतळे हवाई वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला. जम्मू, पंजाब, गुजरात आणि राजस्थान या पाकिस्तानच्या सीमेलगत असलेल्या राज्यात पाकिस्तानने अपयशी हल्ले केले.
नागरी उड्डाण मंत्रालयाने विमानतळे बंद ठेवण्याच्या कारणे सांगितली नाहीयेत. दरम्यान, २४ विमानतळे बंद करण्यात आल्यानंतर विविध हवाई वाहतूक करणाऱ्या विमान कंपन्यांनी प्रवाशांना आवाहन केले आहे.
हवाई वाहतूकीवर परिणाम
हवाई वाहतूक बंद करण्यात आल्याने उत्तर आणि पश्चिम भारतात याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रवाशांनी विमानतळावर जाण्यापूर्वी विमानाबद्दलची अद्ययावत माहिती घ्यावी, असेही विमान कंपन्यांकडून सांगण्यात आले आहे.
एअर इंडियाने म्हटले आहे की, विमानतळावर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाने तपासणीवर भर दिला आहे. त्यामुळे प्रवाशांची चेक इन आणि बोर्डिंग करण्यासाठी अतिरिक्त वेळ द्यावा. विमान निघण्यापूर्वी ७५ मिनिटं आधी चेक इन बंद होईल.