पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 22:00 IST2025-05-08T21:59:34+5:302025-05-08T22:00:01+5:30
India Pakistan Conflict: पाकिस्तानी लष्कराने आज जम्मूपासून जैसलमेरपर्यंतच्या अनेक भागांना लक्ष्य करून क्षेपणास्त्र आणि ड्रोनचे हल्ले केले. मात्र भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीने हे हल्ले उधळून लावले आहेत. त्याबरोबरच पाकिस्तानच्या हवाई दलाला मोठा झटका देताना भारतीय संरक्षण दलांनी पाकिस्तानचं एक एफ-१६ विमानही पाडलं आहे.

पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
बुधवारी रात्री पाकिस्तानने केलेले हल्ले परतवून लावत आज पाकिस्तानमधील हवाई संरक्षण प्रणाली आणि रडार प्रणाली भारतीय सैन्यदलांनी उदध्वस्त केली होती. त्यानंतर आता पाकिस्तानने आज संध्याकाळपासून सीमावर्ती भागांत पुन्हा एकदा आगळीक करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानी लष्कराने आज जम्मूपासून जैसलमेरपर्यंतच्या अनेक भागांना लक्ष्य करून क्षेपणास्त्र आणि ड्रोनचे हल्ले केले. मात्र भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीने हे हल्ले उधळून लावले आहेत. त्याबरोबरच पाकिस्तानच्या हवाई दलाला मोठा झटका देताना भारतीय संरक्षण दलांनी पाकिस्तानचं एक एफ-१६ विमानही पाडलं आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढलेल्या तणावादरम्यान, आज पाकिस्तानने गुरुवारी जम्मूमधील विमानतळावर रॉकेट हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तसेच अनेक ड्रोन भारतातील सीमावर्ती भागांच्या दिशेने धाडले. मात्र भारतीय सैन्यदलांची सतर्कता आणि शक्तिशाली हवाई संरक्षण प्रणालीमुळे पाकिस्तानचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत.
यादरम्यान, भारतीय सैन्यदलांच्या एअर डिफेन्स युनिट्सने पाकिस्तानचं एक एफ-१६ विमान नष्ट केलं आहे. ही कारवाई नियंत्रण रेषेजवळ करण्यात आली आहे. पाकिस्तानचं हे लढाऊ विमान भारताच्या हवाई हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत असताना त्यावर हल्ला करून ते नष्ट करण्यात आले.