Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 15:08 IST2025-05-08T15:03:25+5:302025-05-08T15:08:40+5:30

India Retaliates Pakistan Attack: भारताने सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. भारताने मोठी लष्करी कारवाई करून पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त केली आहे.

India neutralised Pakistan's Chinese-made HQ-9 air defence system Ministry of Defence | Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त

Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त

भारताने सुरू केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'मध्येपाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. भारतानेपाकिस्तानच्या हवाई संरक्षण यंत्रणेवर हल्ला करून ती यंत्रणा उद्ध्वस्त केली आहे. यासंदर्भातील माहिती भारताच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. भारताच्या हल्ल्यांमध्ये क्षेपणास्त्र लाँचर्सचेही मोठे नुकसान झाले आहे. पाकिस्तानला चीनकडून HQ-9 हवाई संरक्षण प्रणाली मिळाली आहे.

Operation Sindoor: मोठी बातमी! कंधार प्लेन हायजॅकचा मास्टरमाईंड रौफ असगरचा हल्ल्यात खात्मा

पाकिस्तानी लोक चीनच्या HQ-9 ची तुलना भारताच्या S-400 हवाई संरक्षण प्रणालीशी करतात. पण आता भारताने HQ-9 तांत्रिकदृष्ट्या S-400 समोर कुठेही टिकत नाही हे दाखवून दिले आहे. HQ-9 ची रडार प्रणाली भारताच्या ब्राह्मोस सारख्या सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांना रोखू शकेल अशी जवळजवळ कोणतीही शक्यता नाही. S-400 ची मारा क्षमता 400 किलोमीटर आहे आणि ती खूप कमी वेळात कार्यान्वित होऊ शकते. 

पाकिस्तानने हल्ल्याचा प्रयत्न केला

भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर चवताळलेल्या पाकिस्तानने ७ आणि ८ मे २०२५ च्या रात्री अमृतसर, अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, जालंधर, भुज, आदमपूर, भटिंडा, लुधियाना भारतीय लष्कराच्या तळावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, भारतीय सैन्याने पाकिस्तानचा हा प्रयत्न हाणून पाडला. दरम्यान, HQ-9 ही चायना प्रेसिजन मशिनरी इम्पोर्ट-एक्सपोर्ट कॉर्पोरेशनने विकसित केलेली एक पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे. 

'ऑपरेशन सिंदूर'मध्ये S-400 ची महत्वाची भूमिका

'ऑपरेशन सिंदूर' मध्ये भारतीय हवाई दलाने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करण्यासाठी हॅमर, स्कॅल्प आणि इतर अचूक शस्त्रांचा वापर केला. या ऑपरेशनमध्येही एस-४०० ने भारतीय हवाई क्षेत्राचे रक्षण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. शत्रूच्या कोणत्याही प्रतिहल्ल्याला हाणून पाडण्यासाठी ही प्रणाली सज्ज होती, यामुळे भारतीय लढाऊ विमानांना सुरक्षितपणे ऑपरेशन पूर्ण करता आले.

पाकिस्तानचे अलिकडचे हल्ले हाणून पाडण्यात s-400 ने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली. या प्रणालीने शत्रूचे ड्रोन आणि क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केले, त्यामुळे भारतीय शहरांचे कोणतेही नुकसान झाले नाही. 

Web Title: India neutralised Pakistan's Chinese-made HQ-9 air defence system Ministry of Defence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.