शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

ऑपरेशन सिंदूरवेळी भारताने एक राफेल विमान गमावले; फ्रान्सच्या हवाई दल प्रमुखांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 11:34 IST

India Vs Pakistan War Update: सहा-सात मे च्या रात्री भारताने पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांवर जोरदार हल्ले केले होते. यावेळी भारताची पाच लढाऊ विमाने पाडल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. यापैकी तीन विमाने ही राफेल होती असेही सांगितले होते.

ऑपरेशन सिंदूरवेळी भारताची पाच लढाऊ विमाने पाडल्याचा दावा पाकिस्तान करत आहे. राफेल पाडल्याची अफवेमागे चीन असल्याचा दावा नुकताच फ्रान्सने केला होता. आता फ्रान्सच्याच हवाई दल प्रमुखांनी ऑपरेशन सिंदूरवेळी भारतीय हवाई दलाने एक राफेल विमान गमावल्याचा दावा केला आहे. 

सहा-सात मे च्या रात्री भारताने पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांवर जोरदार हल्ले केले होते. यावेळी भारताची पाच लढाऊ विमाने पाडल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. यापैकी तीन विमाने ही राफेल होती असेही सांगितले होते. भारताने यावर जास्त माहिती न देता लढाईमध्ये असे नुकसान होत असते, आपले सर्व पायलट सुखरूप माघारी आले असल्याचे म्हटले होते. यामुळे या दाव्याबाबत संदिग्धता होती. त्यावरून आता पडदा हटू लागला आहे. 

फ्रान्स हवाई दलाच्या प्रमुखांनी आता भारताला एका राफेल लढाऊ विमानाचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. आम्ही ८ देशांना राफेल लढाऊ विमाने विकली आहेत. परंतू, युद्धावेळी गमावलेले हे पहिले विमान असल्याचे ते म्हणाले. जेरोम बेलंगर यांनी हा दावा केला आहे. फ्रान्सच्या टॉपच्या अधिकाऱ्याने हा दावा केल्याने पुन्हा एकदा पाकिस्तानने राफेल पाडले की पडले याबाबत चर्चा सुरु झाली आहे. 

दरम्यान, राफेल विमाने बनविणारी कंपनी दसॉल्ट एव्हिएशनने देखील भारताचे राफेल पडल्याचे म्हटले आहे. डसॉल्ट एव्हिएशनचे अध्यक्ष आणि सीईओ एरिक ट्रॅपियर यांच्या हवाल्याने एका फ्रेंच वृत्तपत्राने ही माहिती दिली आहे. भारताने त्यांचे एक राफेल लढाऊ विमान गमावले आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. परंतू हे विमान शत्रूच्या माऱ्यामुळे नाही तर उंचावर तांत्रिक बिघाडामुळे पडल्याचे ट्रॅपियर यांनी म्हटले आहे. एव्हियन डी चासे या फ्रेंच वेबसाइटवर हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. ही घटना विस्तारित प्रशिक्षण मोहिमेदरम्यान १२,००० मीटरपेक्षा जास्त उंचीवर घडली, या घटनेमध्ये शत्रूचा सहभाग नव्हता किंवा शत्रूचा रडार संपर्क झाला नव्हता, असे यात म्हटले आहे. 

भारताने पाकिस्तानचा दावा नाकारलाही नव्हता, अन्...संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी काही दिवसांपूर्वीच लढाऊ कारवायांमध्ये अपरिहार्य नुकसान होते, असे म्हटले होते. तेव्हा त्यांनी राफेल किंवा इतर विमानांचा समावेश आहे की नाही याची पुष्टी केली नाही. परंतू, जेव्हा पाकिस्तान दावा करू लागला होता तेव्हा भारतीय सैन्य दलांच्या एकत्रित पत्रकार परिषदेत हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी आपले सर्व पायलट सुखरूप परत आल्याचे म्हटले होते. 

 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तानIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानwarयुद्धindian air forceभारतीय हवाई दलRafale Dealराफेल डीलFranceफ्रान्स