शहरं
Join us  
Trending Stories
1
BIhar Election 2025: लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
2
"INS विक्रांतच्या नावानेच पाकिस्तानची झोप उडवली होती.."; पंतप्रधान मोदींकडून गौरवोद्गार
3
ऐन दिवाळीत सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; एका झटक्यात चांदी ९ हजारांनी स्वस्त, सोन्याची नवी किंमत काय?
4
"त्या दोघांचा मृत्यू ट्रेनमधून पडून नाही, तर…"; नाशिकमधील अपघाताचं धक्कादायक कारण समोर, जखमीने दिली माहिती
5
शेकडो वर्षे जुने जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर; जाणून घ्या इतिहास आणि मनोरंजक तथ्ये...
6
"मी स्वत:ला भाग्यवान समजतो...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये घरवापसी केल्यानंतर ओंकार भोजनेची पहिली प्रतिक्रिया
7
अजबच! प्रत्येकजण कॉफीमध्ये मीठ का घालतंय? व्हायरल ट्रेंडमागे लपलंय इन्ट्रेस्टिंग सायन्स
8
या भारतीय क्रिकेटरनं घेतली निवृत्ती; रैना-कोहलीच्या कॅप्टन्सीत पदार्पणात रचला होता इतिहास
9
KL Rahul नं खरेदी केलं चालतं-फिरतं हॉटेल! 'ही' लग्जरी इलेक्ट्रिक कार देती ढासू रेंज, जाणून घ्या फीचर अन् किंमत
10
Diwali Sale: आयफोन १७ ला टक्कर देणाऱ्या गुगल पिक्सेल १० च्या खरेदीवर आतापर्यंतची तगडी सूट!
11
‘रो-को’चा फ्लॉप शो! गावसकर म्हणाले, "पुढे दोघांनी ही गोष्ट केली तर आश्चर्यचकित होऊ नका!"
12
युट्यूब शॉर्ट्स की इन्स्टाग्राम रील्स, कुठे होते सर्वाधिक कमाई? जाणून घ्या नेमकं गणित...
13
‘...म्हणून छत्रपती संभाजी महाराजांची त्यांच्या सासऱ्यांनी हत्या केली’, बच्चू कडूंचं धक्कादायक विधान  
14
वार्षिक भविष्य २०२५-२६: महालक्ष्मी कृपेने पुढील वर्षभर कोणत्या राशींना धन, यश आणि भाग्याची साथ?
15
'वॉर २'च्या अपयशानंतर अयान मुखर्जीने 'धूम ४'च्या दिग्दर्शनातून घेतली माघार, 'ब्रह्मास्त्र २'ची तयारी सुरु
16
ऐन दिवाळीत माधुरी दीक्षितला करावं लागलेलं टक्कल, खुद्द 'धकधक गर्ल'ने केला खुलासा
17
"मी मोदींचा भक्त, भाजप म्हणजे घर"; महेश कोठारे म्हणाले, "मुंबईवर कमळ फुलणार, महापौरही इथूनच"
18
पाकिस्तानचे सूर बदलले? शाहबाज यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या; जगभरातील हिंदू असा उल्लेख केला, पण...
19
८०० वर्षांनी वैभव लक्ष्मी-महालक्ष्मी योगात लक्ष्मी पूजन: महत्त्व, महात्म्य, लक्ष्मी आरती
20
दहशत माजवणारा साद रिझवी कुठे गायब झाला? पीएम शहबाज शरीफ यांच्याही आणलेले नाकी नऊ!

भारत आता तो भारत राहिलेला नाही, दहशतवाद नष्ट करणारच!, पंतप्रधान नरेंद्र मोदींची बिहारमध्ये गर्जना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 12:47 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील कराकट येथे झालेल्या भव्य सभेत ४८,५२० कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन व पायाभरणी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील कराकट येथे झालेल्या भव्य सभेत ४८,५२० कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन व पायाभरणी केली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी दहशतवादाविरोधातील देशाच्या लढ्याचा पुनरुच्चार केला.  तसेच, नक्षलवादाच्या विरोधातील यशस्वी मोहिमेवर प्रकाश टाकला.

पंतप्रधान मोदी म्हणाले, “आज बिहारच्या पवित्र भूमीवरून विकासाला नवी चालना देण्याचा संकल्प पूर्ण करत आहे. ५० हजार कोटींपेक्षा जास्त रकमेच्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण झाल्याचा मला अभिमान आहे.” यावेळी त्यांनी उपस्थित मातांसह भगिनींच्या मोठ्या संख्येतील सहभागाबद्दल विशेष उल्लेख करत कृतज्ञता व्यक्त केली.

दहशतवादाविरोधातील कारवाईचे वर्णन

पहलगाम येथील अलीकडील दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत मोदी म्हणाले की, "ज्यांनी पाकिस्तानातून आमच्या देशावर हल्ले घडवले, त्यांच्या लपण्याच्या जागा उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. भारत आता जुना राहिलेला नाही; नव्या भारताने प्रतिशोधाची नवी ताकद दाखवली आहे."

त्यांनी 'ऑपरेशन सिंदूर'चा उल्लेख करत म्हटले की, भारतीय सैन्याने दहशतवाद्यांच्या तळांवर कठोर प्रहार केला. “भारतीय सैन्याच्या साहसामुळे जगाने आमच्या सिंदूरची ताकद पाहिली आहे,” असे ते म्हणाले.

बीएसएफ जवानांचे शौर्य आणि बलिदान

मोदींनी बीएसएफच्या उपनिरीक्षक इम्तियाज यांच्या बलिदानाची आठवण करून दिली. "आपले जवान देशाच्या सुरक्षेसाठी अभेद्य ढाल बनून उभे राहिले आहेत. ऑपरेशन सिंदूरमध्ये त्यांच्या शौर्याला संपूर्ण जगाने सलाम केला आहे," असे ते म्हणाले.

नक्षलवादाविरोधातील लढ्यात मोठे यश

नक्षलप्रभावित भागांबाबत बोलताना पंतप्रधानांनी म्हटले की, "२०१४ पूर्वी १२५ जिल्हे नक्षलग्रस्त होते, तर आता ही संख्या केवळ १८ वर आली आहे. रुग्णालये, मोबाईल टॉवर्स, रस्ते आणि रोजगाराच्या संधी आता नक्षलग्रस्त भागांमध्ये पोहोचत आहेत. आता तो दिवस दूर नाही, जेव्हा माओवादी हिंसाचार पूर्णतः नष्ट होईल.”

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानBiharबिहारIndiaभारत