भारत डिजिटल तंत्रज्ञानाचा 'पॉवरहाऊस', ‘Make in India’ची खिल्ली उडवणाऱ्यांना PM मोदींचे उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 12:23 IST2025-10-08T12:23:15+5:302025-10-08T12:23:50+5:30
Indian Mobile Congress 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जगातील सर्वात मोठ्या टेक इव्हेंट इंडियन मोबाईल काँग्रेसचे उद्घाटन केले.

भारत डिजिटल तंत्रज्ञानाचा 'पॉवरहाऊस', ‘Make in India’ची खिल्ली उडवणाऱ्यांना PM मोदींचे उत्तर
PM Modi IMC 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज(दि.8) देशातील सर्वात मोठ्या टेक इव्हेंट India Mobile Congress 2025 चे उद्घाटन केले आहे. हा कार्यक्रम आता केवळ मोबाइल आणि टेलिकॉम क्षेत्रापुरता मर्यादित न राहता, आशियातील सर्वात मोठा Digital Technology Forum म्हणून विकसित झाला आहे. या प्रसंगी पंतप्रधान मोदींनी सांगितले की, अनेक स्टार्टअप्सनी विविध महत्त्वपूर्ण विषयांवर प्रेझेंटेशन्स दिली आणि त्यामुळेच त्यांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे की, भारतातील टेक्नॉलॉजीचे भविष्य सक्षम हातात आहे.
"Make in India"चा प्रवास आणि टेक्नॉलॉजीतील प्रगती
पीएम मोदी म्हणतात, “जेव्हा मी ‘Make in India’ उपक्रमाची घोषणा केली होती, तेव्हा काही लोकांनी त्याची थट्टा उडवली होती. त्यांना वाटत होते की, भारत टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात प्रगत उत्पादने कशी तयार करेल? परंतु आज भारताने त्यांना चुकीचे ठरवले आहे. जो देश कधीकाळी 2G नेटवर्कसाठी संघर्ष करत होता, आज त्याच देशातील प्रत्येक जिल्ह्यात 5G पोहोचले आहे. हे भारताच्या तंत्रज्ञान क्रांतीचे प्रतीक आहे."
Addressing the India Mobile Congress 2025 in New Delhi. https://t.co/rT6luJNfaD
— Narendra Modi (@narendramodi) October 8, 2025
डेटा दरांमध्ये 98% घट
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कार्यक्रमात सांगितले की, "मागील 11 वर्षांत देशातील डेटा दरांमध्ये तब्बल 98% घट झाली आहे. 2014 मध्ये 1 GB डेटा ₹287 इतका होता, तर आज तो केवळ ₹9.11 वर आला आहे. ही घट भारतातील डिजिटल क्रांतीची आणि दूरसंचार क्षेत्रातील मोठ्या प्रगतीची साक्ष देते."
IMC 2025 ची थीम: “Innovate to Transform”
या वर्षीचा India Mobile Congress 2025 हा कार्यक्रम 8 ते 11 ऑक्टोबर दरम्यान यशोभूमी इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर, नवी दिल्ली येथे होत आहे. या कार्यक्रमाची थीम “Innovate to Transform”, म्हणजेच “नवकल्पनेतून परिवर्तन” आहे. या इव्हेंटमध्ये 6G, सॅटकॉम (SATCOM), क्वांटम कम्युनिकेशन, सायबर सिक्युरिटी, आणि इतर प्रगत तंत्रज्ञानावर चर्चा होणार आहे.
India Mobile Congress म्हणजे काय?
India Mobile Congress (IMC) हा आशियातील सर्वात मोठा टेक्नॉलॉजी, टेलिकॉम आणि मीडिया इव्हेंट आहे. याचे आयोजन Cellular Operators Association of India (COAI) आणि दूरसंचार विभाग (DoT) यांच्या संयुक्त विद्यमाने केले जाते. या मंचावर देश-विदेशातील मोठ्या टेक कंपन्या आपापल्या नेक्स्ट जनरेशन टेक्नॉलॉजीज प्रदर्शित करतात.
IMC 2025 मध्ये या विषयांवर लक्ष केंद्रित
अधिकृत माहितीनुसार, या वर्षीच्या IMC मध्ये खालील प्रमुख क्षेत्रांवर फोकस असेल:
इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग
सेमीकंडक्टर
5G आणि 6G तंत्रज्ञान
क्वांटम कंप्यूटिंग
सायबर सिक्युरिटी
सॅटेलाइट कम्युनिकेशन
डीप टेक आणि क्लीन टेक्नॉलॉजी
स्मार्ट मोबिलिटी आणि इंडस्ट्री 4.0
400 हून अधिक कंपन्या आणि जागतिक सहभाग
या वर्षीच्या India Mobile Congress 2025 मध्ये 400 पेक्षा जास्त कंपन्या, 150 पेक्षा अधिक देशांतील प्रतिनिधी आणि 1.5 लाखाहून अधिक विजिटर्स सहभागी होतील. यूके, जपान, कॅनडा, ऑस्ट्रिया यांसारख्या देशांचे डेलिगेशन या कार्यक्रमात उपस्थित राहतील. यामुळे भारताच्या ग्लोबल टेक्नॉलॉजी पार्टनरशिप्स अधिक मजबूत होतील.
SATCOM सेवांवर विशेष भर
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले की, "भारत सरकारने तीन SATCOM लायसन्स जारी केले आहेत. IMC दरम्यान होणाऱ्या SATCOM समिट मध्ये सॅटेलाइट कम्युनिकेशनद्वारे ग्रामीण आणि दुर्गम भागांपर्यंत कनेक्टिव्हिटी पोहोचविण्याच्या रणनीतीवर चर्चा होईल. दूरसंचार सेवा देणे महत्त्वाचे आहे, तसेच कोट्यवधी लोकांच्या डेटा आणि सुरक्षेचे रक्षण करणेही अत्यावश्यक आहे."