शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

भारताने पाकिस्तानच्या दिशेने रोखली होती ९ क्षेपणास्त्रे, इम्रान खानची उडाली होती फे फे, त्यानंतर...  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2024 12:03 PM

2019 Balakot Airstrike: पाकिस्तानी विमानांच्या घुसखोरीला प्रत्युत्तर देतानाृ भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे विमान कोसळून पाकिस्तानच्या तावडीत सापडते होते. त्यानंतर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेचा घटनाक्रम सर्वांनाच माहिती आहे. मात्र या घटनाक्रमाबाबत काही स्फोटक माहिती समोर आली आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने बालाकोटवर एअरस्ट्राईक केली होती. त्यानंतर पाकिस्तानच्या हवाई दलाने भारताच्या हद्दीत घुसखोरी केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे विमान कोसळून पाकिस्तानच्या तावडीत सापडते होते. त्यानंतर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेचा घटनाक्रम सर्वांनाच माहिती आहे. मात्र या घटनाक्रमाबाबत काही स्फोटक माहिती समोर आली आहे.  ही घटना घडली तेव्हा पाकिस्तानमध्ये असलेले भारतीय उच्चायुक्त अजिय बिसारिया यांच्या लवकरच प्रकाशित होणाऱ्या पुस्तकामध्ये तेव्हाच्या घटनाक्रमाचा उल्लेख करण्यात आला आहे.  यातील काही उल्लेख हे स्फोटक आणि भारताने तेव्हा घेतलेल्या आक्रमक मुत्सद्देगिरीचे पुरावे आहेत.

या रिपोर्टनुसार तेव्हा भारताकडून कुठल्याही क्षणी क्षेपणास्त्र हल्ला होईल, या भीतीने पाकिस्तानची फे फे उडाली होती. पाकिस्तान सरकारने रातोरात बिसारिया यांच्याकडे धावन घेतली होती. तसेच चर्चेच्या माध्यमातून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला होता. पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान हे नरेंद्र मोदींसोबत चर्चा करू इच्छित होते.

२७ फेब्रुवारी २०१९ ची ती रात्र होती. पकडण्यात आलेले भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्याकडून पाकिस्तानच्या तुरुंगात घालवलेल्या रात्रींपैकी ही पहिली रात्र होती. त्या रात्री घडलेल्या घडामोडींबाबत खूप तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, बिसारिया यांनी आपल्या पुढच्या पुस्तकातून भारताने  तेव्हा दाखवलेल्या जबरदस्त मुत्सद्देगिरीचा सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे.

त्या दिवशी मध्यरात्री बिसारिया यांना भारताचे पाकिस्तानमधील तत्कालीन उच्चायुक्त सोहेल महमूद यांचा फोन आला होता. त्यानंतर बिसारिया यांनी दिल्लीत फोन करून विचारणा केली आणि आता पंतप्रधान मोदी हे चर्चेसाठी उपलब्ध नसल्याचा आणि आवश्यक संदेशवहन हे उच्चायुक्तांच्या माध्यमातून होऊ शकते, असे सांगितले.  त्यानंतर बिसारिया यांनी महमूद यांच्याशी पुन्हा चर्चा केली नाही.

त्यानंतर २८ फेब्रुवारी रोजी इम्रान खान यांनी अभिनंदन वर्धमान यांना मुक्त करण्याची घोषणा केली होती. तसेच शांततेसाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र याबाबत त्यांनी काही सविस्तर माहिती दिली नव्हती. पाकिस्तानने अभिनंदन यांच्या सुटकेला शांतीचा संकेत असा रंग देण्याचा प्रयत्न केला. मात्र अभिनंदन यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, अशी भारताने दिलेली धमकी किती गंभीर होती याचा उलगडा पाकिस्तानमधील अमेरिका आणि ब्रिटनच्या राजदुतांसह इतर पाश्चात्य मुत्सद्द्यांनी केला आहे.   

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकindian air forceभारतीय हवाई दलAbhinandan Varthamanअभिनंदन वर्धमानNarendra Modiनरेंद्र मोदीImran Khanइम्रान खानIndiaभारतPakistanपाकिस्तान