अमेरिका-इराण तणावात भारताला लागली लॉटरी, चीन-पाकसह सर्वांनाच लागेल मिर्ची!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 21:57 IST2026-02-20T21:55:28+5:302026-02-20T21:57:21+5:30

आरबीआयच्या आकडेवारीनुसार, या वाढीत परकीय चलन मालमत्तेचा (FCA) वाटा मोठा आहे, जी ३.५५ अब्ज डॉलर्सनी वाढून ५७३.६० अब्ज डॉलर्स झाली आहे. त्याचबरोबर, भारताच्या सोन्याच्या साठ्यातही (Gold Reserve) मोठी वाढ झाली आहे. त्याचे मूल्य ४.९९ अब्ज डॉलर्सनी वाढून १२८.४६ अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहे. 

India has won the lottery amid US-Iran tensions everyone including China-Pakistan tension increases | अमेरिका-इराण तणावात भारताला लागली लॉटरी, चीन-पाकसह सर्वांनाच लागेल मिर्ची!

अमेरिका-इराण तणावात भारताला लागली लॉटरी, चीन-पाकसह सर्वांनाच लागेल मिर्ची!

अमेरिका-इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे जागतिक स्तरावर बाजारपेठेत अस्थिरता दिसत असतानाच, भारताला दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे. देशाचा विदेशी मुद्रा साठ्यात आणि परकीय चलन मालमत्तेत आणि भारताच्या सोन्याच्या साठ्यातही (Gold Reserve) मोठी वाढ झाली आहे.

विदेशी मुद्रा साठ्यात वाढ -
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, १३ फेब्रुवारीला संपलेल्या आठवड्यात देशाचा विदेशी मुद्रा साठा ८.६६ अब्ज डॉलर्सनी वाढून ७२५.७२ अब्ज डॉलर्सच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचला आहे.

विदेशी चलन आणि सुवर्ण साठ्यात जबरदस्त वाढ - 
आरबीआयच्या आकडेवारीनुसार, या वाढीत परकीय चलन मालमत्तेचा (FCA) वाटा मोठा आहे, जी ३.५५ अब्ज डॉलर्सनी वाढून ५७३.६० अब्ज डॉलर्स झाली आहे. त्याचबरोबर, भारताच्या सोन्याच्या साठ्यातही (Gold Reserve) मोठी वाढ झाली आहे. त्याचे मूल्य ४.९९ अब्ज डॉलर्सनी वाढून १२८.४६ अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहे. 

विशेष रेखांकन अधिकार (SDR) १०.३ कोटी डॉलरने वाढून १८.९२ अब्ज डॉलर झाला आहे. महत्वाचे म्हणजे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतील (IMF) भारताच्या राखीव निधीतही वाढ नोंदवण्यात आली आहे. जो १.९ कोटी डॉलरने वाढून 4.734 अब्ज डॉलर झाला आहे.

...पण रुपया ९१ च्या जवळ -
चलनांच्या बाजारात भारतीय रुपयाची घसरण सुरूच आहे. शुक्रवारी रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ३१ पैशांनी घसरून ९०.९९ (तात्पुरता) या पातळीवर बंद झाला. व्यवहारादरम्यान रुपयाने ९१.०४ चा निचांक गाठला होता. महत्वाचे म्हणजे, शेअर बाजारातील तेजी देखील रुपयाला सावरण्यास अपयशी ठरली. 

विश्लेषकांच्या मते, देशांतर्गत शेअर बाजारातील तेजी देखील रुपयाला आधार देऊ शकली नाही. अमेरिका आणि इराण याच्या वाढत्या तणावामुळे आणि युद्धाच्या शक्यतेमुळे गुंतवणूकदारांच्या मनात भीतीचे वातावरण आहे, याचा थेट परिणाम रुपयाच्या मूल्यावर झाला आहे. 

Web Title : अमेरिका-ईरान तनाव में भारत को फायदा; चीन-पाक को होगी परेशानी

Web Summary : अमेरिका-ईरान के बढ़ते तनाव के बीच भारत का विदेशी मुद्रा भंडार रिकॉर्ड स्तर पर पहुंचा। सोने के भंडार में भी वृद्धि हुई। हालांकि, शेयर बाजार में तेजी के बावजूद वैश्विक अनिश्चितता से रुपया कमजोर हुआ, 91 के करीब।

Web Title : India Gains Amid US-Iran Tension; China, Pakistan Face Challenges

Web Summary : Rising US-Iran tensions boost India's foreign reserves to record highs. Gold reserves also surged. However, the rupee weakened, nearing 91 against the dollar, impacted by global uncertainty despite stock market gains.