शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 18:13 IST

Indus Water Treaty: पाकिस्तान आपल्या 80 टक्के शेतीसाठी सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे.

Indus Water Treaty: पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने सिंधू पाणी करार स्थगित केल्यामुळे पाकिस्तानात प्रचंड भीतीचे वातावरण आहे. पाकिस्तान आपल्या 80 टक्के शेतीसाठी सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. भारताने पाणी रोखल्यामुळे पाकिस्तानच्या शेतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. आता अशातच, भारताने पाकिस्तानला आणखी एक जोरदार झटका देण्याची तयारी केली आहे. 

भारताच्या प्रकल्पाने पाकिस्तानला धक्का रॉयटर्सच्या वृत्तानुसार, सिंधू पाणी करार स्थगित झाल्यापासून चिनाब, झेलम आणि सिंधू नद्यांवर प्रकल्पाचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. या प्रदेशातील मुख्य प्रकल्पांपैकी एक म्हणजे चिनाब नदीवरील रणबीर धरणाची लांबी दुप्पट करणे. या नदीचे पाणी भारतातून पाकिस्तानातील पंजाबमधील शेती क्षेत्रात जाते.

रिपोर्टनुसार, जेव्हा भारत आपला प्रकल्प पूर्ण करेल, तेव्हा ते प्रति सेकंद 150 घनमीटर पाणी वळवू शकेल, सध्या फक्त 40 घनमीटर पाणी वळवण्याची क्षमता आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी त्यांच्या संसदेत सांगितले की, त्यांच्या सरकारने भारताला पत्र लिहून सिंधू पाणी कराराचा पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. 

भारताच्या कृतीमुळे पाकला झटका बसणार

वॉशिंग्टनस्थित सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीजमधील जल सुरक्षा तज्ज्ञ डेव्हिड मिशेल म्हणाले की, भारताला धरणे, कालवे किंवा इतर पायाभूत सुविधा बांधण्यासाठी वेळ लागेल. पण, त्यांनी पाकिस्तानला इशाराही दिला की, त्यांना भारताकडून कोणत्या प्रकारच्या दबावाला तोंड द्यावे लागू शकते, हे आता कळले असेल. 

दरम्यान, रणबीर कालव्याच्या विस्ताराच्या योजनेसोबतच, भारत अशा प्रकल्पांवरही विचार करत आहे, ज्यामुळे पाकिस्तानला वाटप केलेल्या नद्यांमधून पाण्याचा प्रवाह कमी होईल. यामुळे पाकिस्तानला स्वतःसाठी वीज निर्मिती करण्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल.

भारताने जलविद्युत प्रकल्पांची यादी तयार केलीअहवालानुसार, भारताने जम्मू आणि काश्मीर प्रदेशात जलविद्युत प्रकल्पांची यादी तयार केली आहे, ज्यामुळे वीज निर्मिती 3,360 मेगावॅटवरून 12,000 मेगावॅटपर्यंत वाढेल. या प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठवू शकणारे धरणे देखील समाविष्ट आहेत. पंतप्रधान मोदींनी स्पष्टपणे म्हटले आहे की, पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी मंगळवारी (13 मे) सांगितले की, पाकिस्तान दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवत नाही, तोपर्यंत भारत सिंधू पाणी करार स्थगित ठेवला जाईल.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतPakistanपाकिस्तान