शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

चिनी एअरफोर्सची मोठी तयारी सुरू, हालचाली कैद; हवाई दलाने सांभाळला मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 22:15 IST

भारतीय हवाई दलाने चीनच्या कुठल्याही कृत्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आपल्या एअरबेसवर सुखोई-30, सुखोई-30 एमकेआय, मिग-29 आणि मिराज-2000, आधीपासूनच तैनात करून ठेवले आहेत.

ठळक मुद्देचिनी एअर फोर्सने आपले अनेक एअरबेस अपग्रेड केले आहेत.चीनने भारताला लागून असलेल्या भागांत तैनात केली आहेत लढाऊ विमानं.चीनच्या कुठल्याही कृत्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय हवाई दल तयार.

नवी दिल्ली - पूर्व लडाखमध्येचीनसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय एजन्सिज अत्यंत सतर्क आहेत. भारतीय एजन्सिज ​​अरुणाचल प्रदेशच्या उत्तरेकडे लडाखच्या दुसऱ्या बाजूला एलएसीवर पिपल्स लिबरेशन आर्मीच्या हवाई दलाच्या हालचालींवर लक्ष ठेऊन आहेत. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिनजियांग आणि तिबेट भागात PLAAF च्या होटन, गर गुनसा, काशघर, होपिंग, डोंका डोंग, लिन्झी आणि पंगट एअरबेसवर पूर्णपणे लक्ष ठेवले जात आहे.

चिनी एअर फोर्सने आपले अनेक एअरबेस अपग्रेड केले आहेत -सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिनी एअर फोर्सने आपले अनेक एअरबेस अपग्रेड केले आहेत. चिनी हवाई दलाने हार्डेन शेल्‍टर्सची निर्मिती आणि रनवेची लांबी वाढवली आहे. एवढेच नाही, तर त्यांनी अतिरिक्त सैनिकही तैनात केले आहेत. भारताच्या इशान्येकडील राज्यांच्या जवळच दुसऱ्या बाजूला चीनचे लिनझी एअरबेस आहे. हे प्रामुख्याने एक हेलिकॉप्टर बेस आहे. चीनने लागून असलेल्या भारतीय भागांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि आपली हालचाल वाढवण्यासाठी तेथे हेलिपॅडचे नेटवर्कदेखील तयार केले आहे.

चीनने भारताला लागून असलेल्या भागांत तैनात केली आहेत लढाऊ विमानं -सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जगासमोर चर्चा आणि शांतीचा देखावा करणाऱ्या चीनने लडाखच्या भागांत तसेच भारताला लागून असलेल्या इतर भागांत लढाऊ विमानं तैनात केली आहेत. यात सुखोई-30ची चिनी अवृत्ती आणि स्वदेशी जे-सीरीजच्या बॉम्बर्सचा समावेश आहे. भारतीय एजन्सिज, उपग्रह आणि इतर माध्यमांच्या सहाय्याने या सर्व लढाऊ विमानांवर लक्ष ठेऊन आहेत. भारतीय हवाई दलानेही चिनी सैन्याच्या या हालचाली पाहता, आपली तयारीही पूर्ण केली आहे.

चीनच्या कुठल्याही कृत्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय हवाई दल तयार -भारतीय हवाई दलाने चीनच्या कुठल्याही कृत्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आपल्या एअरबेसवर सुखोई-30, सुखोई-30 एमकेआय, मिग-29 आणि मिराज-2000, आधीपासूनच तैनात करून ठेवले आहेत. हवाईदल प्रमूख एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया यांनी एका फ्रंटलाईन एअरबेसवर मिग-21 बायसन जेट विमानाने उड्डाण केले होते. तसेच तयारीची पाहणीही केली होती. 

महत्त्वाच्या बातम्या -

15 ऑगस्टला पंतप्रधान मोदींनी लडाखवरून सुनावलं; आता अशी आली चीनची प्रतिक्रिया

उद्धव ठाकरे 'पुत्रमोह झालेले धृतराष्ट्र'; भाजपाच्या बड्या नेत्याचा निशाणा, संजय राऊतांना दिला असा इशारा

'हे' गाणं ऐकल्यानंतर अनेकांनी केल्या होत्या आत्महत्या, तब्बल 62 वर्षे घालण्यात आली होती बंदी!

CoronaVirus Vaccine : पाकिस्तान कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षणासाठी तयार!

CoronaVirus News: लोकांना संक्रमित करण्यासाठी अमेरिका तयार करतोय नवा कोरोना व्हायरस!

CoronaVirusVaccine : रशियन कोरोना लसीची अमेरिकेने उडवली खिल्ली, म्हणाले - माकडा लायकही नाही!

CoronaVaccine: पश्चिमेकडील देशांना रशियाचं थेट प्रत्युत्तर; सांगितलं, 'या'मुळे खास आहे Sputnik V लस

CoronaVaccine: रशियन कोरोना लसीला जगभरातून जबरदस्त मागणी, 20 देशांकडून मिळाली 1 अब्ज डोसची ऑर्डर

टॅग्स :border disputeसीमा वादladakhलडाखchinaचीनIndiaभारत