शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

India China FaceOff: चीनची घुसखोरी उधळण्यासाठी भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज, पेंगाँग सरोवर, अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर क्षेपणास्त्रेही तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 06:12 IST

चीन सातत्याने करीत असलेल्या आगळीकीला रोखण्यासाठी भारतीय लष्कराने अरुणाचल प्रदेशलगतच्या सीमेवर व पेंगाँग सरोवराच्या परिसरातील गस्त अधिक कडक केली आहे.

नवी दिल्ली : प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चुमारमध्ये चीनने घुसखोरीचा प्रयत्न केल्याच्या वृत्ताचा भारतीय लष्कराने इन्कार केला असला तरी हा देश सातत्याने करीत असलेल्या आगळीकीला रोखण्यासाठी भारतीय लष्कराने अरुणाचल प्रदेशलगतच्या सीमेवर व पेंगाँग सरोवराच्या परिसरातील गस्त अधिक कडक केली आहे.लडाखमधील चुमार येथे चिनी लष्कराच्या हालचालींना घुसखोरी म्हणता येणार नाही. शांतताकाळात सैन्याच्या अशा हालचाली सुरू असतात, असे भारताने म्हटले आहे. हद्दीवर असलेल्या पेंगाँग तलाव परिसरातील जैसे थे स्थिती बदलण्याचा चीनचा प्रयत्न हाणून पाडण्याचे भारताने ठरविले आहे. तेथील स्थितीचा संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आढावा घेतला असून इथे जवानांना आक्रमक पवित्रा घ्यावा, असा आदेश दिला आहे.नवी दिल्ली : ईशान्य लडाख सीमेवरून भारतीय हद्दीत घुसखोरीचा चिनी सैनिकांचा डाव हाणून पाडल्यानंतर या भागातील तणाव अजूनही कायम आहे. भारतीय जवान आपल्या जागेपासून तसूभरही मागे हटले नसून सलग तिसऱ्या दिवशी भारत-चीनदरम्यान कमांडर स्तरावरील चर्चा पार पडली. अद्याप चर्चेतून काहीही निष्पन्न झाले नसले तरी भारताने पुन्हा एकदा ड्रॅगनला झटका दिला आहे. माहिती व दूरसंचार मंत्रालयाने पबजीसह चीनच्या अनेक अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे.चिनी सैनिकांची कोंडीपेंगाँग सरोवराच्या दक्षिण बाजूला असलेल्या पर्वतशिखरांवर भारतीय जवान आता पाय घट्ट रोवून उभे आहेत. त्यामुळे घुसखोरी करण्याची संधी शोधणाºया चिनी सैनिकांची कोंडी झाली आहे. पेंगाँग सरोवर परिसरात भारतीय हद्दीत लष्कराने रणगाडाभेदी क्षेपणास्त्रे, रणगाडे हेही आता तैनात केले आहेत.संरक्षणमंत्री चीनशी करणार नाही चर्चाकेंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह शांघाय कोआॅपरेशन आॅर्गनायझेशनच्या (एससीओ) बैठकीसाठी रशियाच्या तीन दिवसांच्या दौºयावर बुधवारी रवाना झाले. एससीओची बैठक शुक्रवारपासून मॉस्को येथे होणार आहे. या दौºयात संरक्षणमंत्री राजनाथसिंह चिनी मंत्री किंवा अधिकाऱ्यांशी कोणतीही चर्चा करणार नाहीत.चीन हा देशात व देशाबाहेरही सध्या अत्यंत आक्रमक भूमिका घेत आहे. चीनचे वर्तन अस्वस्थ करणारे आहे. भारत व चीनच्या सीमेवरील स्थितीवर आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत, असे अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने म्हटले आहे.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावIndiaभारतladakhलडाख