शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

India China Faceoff: LACवरच्या चकमकीनंतर मोदी सरकार ऍक्शनमध्ये; राजनाथ सिंहांनी तिन्ही सैन्यदलांची बोलावली बैठक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 14:53 IST

सोमवारी रात्री गलवान खो-यात दोन्ही देशांच्या सैन्य अधिका-यांमध्ये चर्चा सुरू असताना ही घटना घडली.

नवी दिल्लीः भारत आणि चीनमध्ये पूर्व लडाखजवळच्या LACवरून वाद सुरू आहे. चिनी सैन्य आणि भारतीय लष्करामध्ये झालेल्या चकमकीत भारताचे तीन जवान आज शहीद झाले. त्यानंतर लागलीच मोदी सरकारनं हालचाली वाढवल्या असून, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण सेवा प्रमुख (सीडीएस) जनरल बिपीन रावत यांच्यासह तीन सेना प्रमुखांची बैठक घेतली आहे.या बैठकीला परराष्ट्रमंत्री एस. जयशंकरही उपस्थित आहेत. विशेष म्हणजे लडाख सीमेवर भारत आणि चीनमधील वाद बर्‍याच काळापासून सुरू आहे. सोमवारी रात्री दोन्ही देशांच्या सैन्यात एक हिंसक झडप झाली. या चकमकीत भारतीय लष्कराचे अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले आहेत. सोमवारी रात्री गलवान खो-यात दोन्ही देशांच्या सैन्य अधिका-यांमध्ये चर्चा सुरू असताना ही घटना घडली.काय आहे संपूर्ण प्रकरण?भारत-चीन सीमेवर गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. चीन सातत्याने असे म्हणत आहे की, हे प्रकरण चर्चेच्या माध्यमातून सोडवायचे आहे, परंतु सैन्य माघारी घेण्यास तयार नाही. चिनी सैनिकांना माघार घ्यावी लागेल, असे भारताने स्पष्ट केले होते. एलएसीवरील बदललेली परिस्थिती भारत कधीही स्वीकारणार नसल्याचंही मोदी सरकारनं स्पष्ट केलं होतं.तत्पूर्वी दोन्ही देशांदरम्यान असा निर्णय घेण्यात आला होता की, चिनी सैन्य गलवान व्हॅलीतील पेट्रोलिंग पॉइंट्स 14, 15 आणि 17 एपासून माघार घेईल. चिनी सैन्य श्योक नदी आणि गलवान नदीच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत आली होती. तीही हळू हळू माघार घेत होती, परंतु पूर्णपणे मागे हटली नव्हती. चीनी सैन्य पूर्णपणे परत जाईल, असा काल निर्णय झाला होता.दोन्ही देशांच्या लष्करी अधिका-यांनी घेतलेल्या निर्णयानंतर जेव्हा चिनी सैन्याने परत जाण्यास नकार दिला, तेव्हा हिंसक चकमक झाली. या चकमकीत भारताचे वरिष्ठ अधिकारी आणि दोन सैनिक शहीद झाले आहेत. चीनकडून कुठल्याही दुर्घटनेची बातमी नाही. चीन सीमेवरची परिस्थिती तणावपूर्ण आहे.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंह