शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

India China FaceOff: लडाखमधील जवळपास १ हजार चौरस किलोमीटर भूभाग चीनच्या नियंत्रणाखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 16:56 IST

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील भाग चीनच्या ताब्यात; ड्रॅगनकडून मोठा फौजफाटा तैनात

नवी दिल्ली: पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनचं सैन्य गेल्या ४ महिन्यांपासून आमनेसामने उभं ठाकलं आहे. दोन्ही देशांमधील तणाव वाढला असताना चीनकडून घुसखोरीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र भारतीय जवानांनी चिनी सैन्याचे मनसुबे उधळले आहेत. मात्र सीमेवरील तणाव वाढला असताना लडाखमधील जवळपास १ हजार चौरस किलोमीटरचा भूभाग चीनच्या नियंत्रणाखाली गेल्याचं वृत्त 'द हिंदू' या इंग्रजी वृत्तपत्रानं दिलं आहे.विशेष- चीन भारताला वारंवार १९६२ची आठवण का करून देतो? त्यावेळी भारतानं नक्की काय गमावलं?लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील जवळपास १ हजार चौरस किलोमीटर भागावर आता चीनचं नियंत्रण आहे. तशी माहिती गुप्तचर विभागानं दिलेल्या इनपुट्समधून मिळाल्याचं केंद्रातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिल्याचं 'द हिंदू'नं आपल्या वृत्तात म्हटलं आहे. एप्रिल-मेपासून चीन सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करत आहे. १५ जूनला पूर्व लडाखमधल्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैन्यात जोरदार झटापट झाली. यात भारताच्या २० जवानांना वीरमरण आलं, तर चीनचंही मोठं नुकसान झालं. या झटापटीत चीनचे किती सैनिक शहीद याची माहिती अद्याप तिथल्या सरकारनं जाहीर केलेली नाही....तर १९६२ पेक्षा जास्त नुकसान होईल; घुसखोरीत अपयशी ठरलेल्या चीनची भारताला धमकी डेपसांगपासून ते चौशुलपर्यंत चीननं सैन्याचं प्रमाण अतिशय पद्धतशीरपणे वाढवलं आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील चिनी सैन्याची संख्या गेल्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. ९०० चौरस किलोमीटर भाग चीनच्या नियंत्रणाखाली आहे. गलवान खोऱ्यातील २० चौरस किलोमीटर, हॉट स्प्रिंग्समधील १२ चौरस किलोमीटर भूभागावर चीनचं नियंत्रण आहे. तर पँगाँग त्सो परिसरातील ६५ चौरस किलोमीटर, चौशुलमधील २० चौरस किलोमीटर भाग चीनच्या ताब्यात आहे. ...अन् बघता बघता भारतीय जवान उंच चौक्यांवर चढले; चिनी सैन्य हैराण होऊन पाहतच राहिले

२९-३० ऑगस्टच्या रात्री काय घडलं?पूर्व लडाखमधील पँगाँग तलाव परिसरात चिनी सैनिकांनी २९-३० ऑगस्टच्या मध्यरात्री घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. भारतीय जवानांनी चिनी सैन्याला चोख प्रत्युत्तर दिलं. भारत आणि चीन सैन्यामध्ये झालेल्या बैठकांमध्ये काही गोष्टींबद्दल सहमती झाली होती. त्यांचं उल्लंघन करण्याचा प्रयत्न चीनकडून करण्यात आल्याची माहिती भारतीय सैन्यानं दिली.  पँगाँग तलावाच्या दक्षिणी किनाऱ्यावरून चिनी सैन्यानं घुसखोरीचा प्रयत्न केला. त्याला भारतानं विरोध केला. चिनी सैन्याला भारतीय सैन्यानं रोखलं. त्यानंतर भारतानं या भागातील फौजफाटा वाढवला.गेल्या चार महिन्यांपासून पूर्व लडाखमधील सीमावर्ती भागातील तणाव कमी झालेला नाही. तणाव कमी करण्यासाठी दोन्ही सैन्याच्या अधिकाऱ्यांच्या बैठकांचं सत्र सुरू आहे. मात्र अद्यापही परिस्थितीत बदल झालेला नाही. एप्रिल पूर्वी असलेली परिस्थिती कायम ठेवावी, अशी स्पष्ट भूमिका भारतानं घेतलेली आहे. एका बाजूला लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू असताना दुसऱ्या बाजूला परराष्ट्र मंत्रालयांच्या माध्यमातूनही चर्चा सुरू आहेत. पूर्व लडाखमधून सैन्य माघारी घेण्याबद्दल दोन्ही देशाचं एकमत झालं आहे. मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही....म्हणून भारत-चीनसाठी महत्त्वपूर्ण आहे गलवान खोरेपेंगाँग सरोवराचे 'फिंगर्स' म्हणजे नेमकं आहे तरी काय? ज्यांच्यामुळे भारत-चीन आले 'आमने-सामने'दौलत बेग ओल्‍डी : जगातील सर्वात उंचावरची हवाई पट्टी, चीनच्या डोळ्यात खुपतेय भारताची 'सर्वोच्च' शक्ती

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावladakhलडाख