शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

India China FaceOff: गलवानमध्ये ८०० मीटर क्षेत्रावर चीनचा दावा; ६१ वर्षापूर्वीची ‘ती’ बातमी व्हायरल, भारत सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 07:53 IST

चीनकडून गलवान खोऱ्यातील ८०० मीटर क्षेत्रावर प्रथमच दावा यावर्षी एप्रिलमध्ये बटालियन पातळीच्या बैठकीत करण्यात आला.

ठळक मुद्दे१९५९ मध्ये भारत आणि चीन यांच्यात पेट्रोल पॉईंट १४ बाबत एकमत झाले होतेएप्रिल २०२० मध्ये चीनने भारताच्या ८०० मीटर क्षेत्रावर दावा केला१९६२ चा पेपर कटिंग सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला

नवी दिल्ली – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात रविवारी झालेल्या टेलिफोन संवादानंतर चीनने एलएसीवरील सैनिक मागे हटवण्यावर सहमती दर्शवली. पेट्रोल पॉईंट १४ ही तीच जागा आहे ज्यासाठी दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरु आहे. याठिकाणी चिनी सैनिकांनी बंकर उभे केले, त्यानंतर रक्तरंजित संघर्ष झाला. त्यात भारताचे २० जवान शहीद झाले तर चीनचेही अनेक सैनिक मारले गेले. चीनने भारतीय सीमेत ८०० मीटर परिसरावर दावा केला होता हे आता स्पष्ट झालं आहे.

चीनकडून गलवान खोऱ्यातील ८०० मीटर क्षेत्रावर प्रथमच दावा यावर्षी एप्रिलमध्ये बटालियन पातळीच्या बैठकीत करण्यात आला. त्यानंतर गलवान आणि श्योक नद्यांच्या संगमावर भारताने पूल बांधण्यास सुरुवात केली. तथापि, १५ जूनचा हिंसक संघर्ष या घटनेशी संबंधित नाही. कारण ६१ वर्षापूर्वी जो करार झाला होता त्याची भारतीय सैन्याला पूर्ण माहिती होती. वास्तविक, १९५९ मध्ये भारत आणि चीन यांच्यात पेट्रोल पॉईंट १४ बाबत एकमत झाले होते, त्यानंतर अनेक वर्षांपासून येथे दोन्ही सैन्यात संघर्ष झाला नाही. पण एप्रिल २०२० मध्ये चीनने भारताच्या ८०० मीटर क्षेत्रावर दावा केला त्यावर ६१ वर्षापूर्वी  सहमती झाली होती.

अशा परिस्थितीत पुन्हा एकदा गलवान खोऱ्यात सैन्य मागे घेण्याची बातमी आली तेव्हा १९६२ चा पेपर कटिंग सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. या वृत्तपत्राचं शीर्षक असं होतं- 'चीन सैन्य गलवान पोस्टमधून मागे हटणार, दिल्लीच्या इशाऱ्याचा परिणाम दिसून येत असल्याचेही लिहिले गेले आहे.

किमान या बातमीमुळे भारताला सावध राहण्याचा संदेश तरी मिळाला आहे. कारण यानंतर बरोबर ९१ दिवसांनी १९६२ चं युद्ध झालं होतं. ज्यात चीनने आपले सैन्य गलवान आणि बर्‍याच भागात पाठवले होते. १५ जूनच्या संघर्षानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सैन्याच्या मदतीने परिस्थितीवर सतत नजर ठेवत आहेत, त्यानंतर परिस्थिती आता पुन्हा सावरताना दिसत आहे. सध्यातरी दोन्ही देशाच्या प्रतिनिधींनी शांतता प्रस्थापित राहण्यासाठी सहमती दर्शवत एकमत करण्याच्या मार्गाने पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत.

 

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावchinaचीनIndiaभारतIndian Armyभारतीय जवानAjit Dovalअजित डोवाल