शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
3
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
4
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
5
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
6
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
7
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
8
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
9
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
10
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
11
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
12
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
13
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
14
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
15
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
16
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
17
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
18
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
19
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
20
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी

तणाव वाढतोय : POKमध्ये पाकिस्तान, तर LACवर चीननं आणलं 20 हजार सैन्य, भारतीय जवानही अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 15:24 IST

सरकारच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनने सीमेवर 20 हजार जवान तैनात केले आहेत. याच बरोबर चीनने  उत्तर शिनझियांग प्रांतातील आपल्या अतिरिक्त डिव्हिजनलाही एलएसीवर आणण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देचीनने सीमेवर 20 हजार जवान तैनात केले आहेत. एलएसीवरील चीनच्या प्रत्येक हालचालीवर भारतीय संरक्षण संस्थांची नजर आहे.गलवान खोरे, पेट्रोलिंग पॉइंट-15, पेंगाँग त्सो आणि फिंगर एरियामध्ये भारताने तैनाती वाढवली आहे.

लेह - लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोलवर (एलएसी) सातत्याने तणाव वाढत आहे. यातच चीनने अपली तैनाती अणखी वाढवली आहे. आता चीनने सैन्याच्या दोन डिव्हिजन सीमेवर तैनात केल्या आहेत. याला प्रत्युत्तर देत भारतीय लष्करानेही एलएसीवर आपली तैनाती वाढवली आहे. हा तणाव ऑक्टोबरपर्यंत असाच सुरू राहण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तिबेट आणि शिनजियांग प्रांतात असलेले चीनचे 10 हजार अतिरिक्त सैनिक गेल्या काही दिवसांपासून युद्धाभ्यास करत आहेत. एलएसीवरील चीनच्या प्रत्येक हालचालीवर भारतीय संरक्षण संस्थांची नजर आहे. एका वृत्त वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, सरकारी सूत्रांनीही एलएसीवर चीनने अतिरिक्त सैनिक तैनात केल्याची पुष्टी केली आहे.

भारताने ब्रिगेड एवढ्या जवानांना केले तैनात -गलवान खोरे, पेट्रोलिंग पॉइंट-15, पेंगाँग त्सो आणि फिंगर एरियामध्ये भारताने तैनाती वाढवली आहे. चीनचा सामना करण्यासाठी भारताने एक ब्रिगेड एवढे सैन्य तैनात केले आहे. याशिवाय भारताने रणनीतीक पॉइंट्सवरही आपली तैनाती अधिक वाढवली आहे. तसेच टँक आणि शस्त्रास्त्रे सीमेवर पोहोचविली जात आहेत.

चीनने 20 हजार जवान केले तैनात -सरकारच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनने सीमेवर 20 हजार जवान तैनात केले आहेत. याच बरोबर चीनने  उत्तर शिनझियांग प्रांतातील आपल्या अतिरिक्त डिव्हिजनलाही एलएसीवर आणण्याचा निर्णय घेतला आहे. चिनी सैन्याचे अतिरिक्त डिव्हिजन 48 तासांत भारतीय पोझिशनवर पोहोचू शकते. 

पाकिस्तानने LOCवर आणले 20 हजार सैनिक -लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यात तणाव सुरू असतानाच पाकिस्ताननेही गिलगित-बाल्टिस्तानमध्ये एलओसीजवळ सैन्याच्या दोन डिव्हिजन तैनात केल्या आहेत. म्हणजेच एलओसीजवळ जवळपास 20 हजार सैनिक तैनात करून पाकिस्तान भारतावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. यासंदर्भात पाकिस्तान, असे कृत्य चीनच्या इशाऱ्यावर करत असल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

चीनच्या प्रत्येक हालचालीवर नजर -सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आमचे चीनच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष आहे. चीन सीमेवर सातत्याने सैनिक वाढवत आहे. यामुळी चीनची काही चाल तर नाही ना? अशी शंका उत्पन्न होत आहे. कारण, चर्चेदरम्यान चीनने मागे हटन्याचे आश्वासन दिले होते. मात्र, तो सीमेवर सातत्याने तैनाती वाढवतच चालला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या -

भारताकडे आहे 'अग्नीबाण', काही मिनिटांत बेचिराख होऊ शकतो चीन; 'ही' मोठी शहरं येतात थेट निशाण्यावर!

अॅप्सनंतर चीनला आणखी एक हादरा देण्याच्या तयारीत सरकार? 'या' मोठ्या कंपनीला बसू शकतो 'जोर का झटका'!

India China Standoff : चीनचा सामना करायला पुढच्याच महिन्यात येतंय राफेल, 'हे' बलाढ्य मित्र भारताला देणार घातक शस्त्रास्त्र

भारताच्या 'या' खास मित्रानं घेतला सैन्य तैनातीचा निर्णय, चीनला फुटला घाम; सुरू केली भारताची 'तारीफ पे तारीफ'

India-China faceoff: आता भारताला मिळाली या 'बलाढ्य' मित्राची साथ, चीनच्या 'घेराबंदी'ला सुरुवात; सामना करायला तयार

India China Tension : चीनचा सामना करण्यासाठी 'भीष्म' मैदानात, 'ही' आहे 'खासियत'

 

टॅग्स :border disputeसीमा वादBorderसीमारेषाIndiaभारतchinaचीनSoldierसैनिकIndian Armyभारतीय जवान