गलवानमध्ये अडकले भारतीय जवान; 'या' महत्वाच्या भागात 8 किमी आत घुसला चीन, बंकर्सही बनवले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 09:38 AM2020-06-21T09:38:43+5:302020-06-21T09:54:01+5:30

ज्या ठिकानांसंदर्भात दोन्ही देशांची भूमिका भिन्न आहे. अशा ठिकानांवरून चीनने मागे हटावे, असे भारताने स्पष्ट केले आहे. एप्रिलपूर्वी जी स्थिती होती तीच स्थिती भारताला हवी आहे.

India China Face Off China soldiers occupying 8km stretch of Pangong tso in Ladakh | गलवानमध्ये अडकले भारतीय जवान; 'या' महत्वाच्या भागात 8 किमी आत घुसला चीन, बंकर्सही बनवले

गलवानमध्ये अडकले भारतीय जवान; 'या' महत्वाच्या भागात 8 किमी आत घुसला चीन, बंकर्सही बनवले

Next
ठळक मुद्देचिनी सैनिकांनी पेंगाँग त्सो जवळ 8 किलोमीटर भागावर कब्जा केला आहे.फिंगर 4 ते 8 दरम्यानच्या ऊंच भागांवर पिपल्‍स लिब्रेशन आर्मीच्या (PLA) सैनिकांनी कब्बजा केला आहे.LAC फिंगर 9वर उत्‍तरेपासून दक्षिणेकडे जाते.

नवी दिल्‍ली : पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्याचे चित्र अद्याप स्पष्ट नाही. मात्र, एक गोष्ट निश्चित, की चिनी सैनिकांनी पेंगाँग त्सो जवळ 8 किलोमीटर भागावर कब्जा केला आहे. मेच्या सुरुवातीला येथे पाऊल ठेवलेल्या चीनने डिफेन्स स्‍ट्रक्‍चर्स आणि बंकर्सदेखील तयार केले आहेत. सरोवराच्या उत्तरेकडील काठावर फिंगर 4 ते 8 दरम्यानच्या ऊंच भागांवर पिपल्‍स लिब्रेशन आर्मीच्या (PLA) सैनिकांनी कब्बजा केला आहे. गलवान घाटी आणि हॉट स्प्रिंग्‍ससंदर्भात भारत-चीनदरम्यान बोलने होत असतानाच, चीनने येथे आपल्या हालचाली वाढवल्याचे समजते.

PHOTO : 'या'च भागत तब्बल 8 किमी आत घुसला चीन; ...म्हणून 'आमने-सामने' आलंय लष्कर

'गलवानमध्ये धैर्याने उभे आहेत भारतीय जवान' -
आधिकृत सूत्रांच्या हवाल्याने नवभारत टाइम्सने म्हटले आहे, की गलवान खोऱ्यात पेट्रोल पॉइंट 14 जवळील भागांत भारतीय लष्कर धैर्याने उभे आहे. येथेच 15-16 जूनच्या रात्री दोन्ही देशांदरम्यान हिंसक झटापट झाली होती. या घटनेनंतर लष्कराने म्हटले होते, की दोन्ही देशांचे सैन्य तेथून मागे हटले आहेत. "गलवानमध्ये दोन्ही देशांचे सैन्य आपापल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या (LAC) आत आहे. मात्र, दोन्हीकडेही लष्कराची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच लष्कर पूर्णपणे मागे हटलेले नाही."

भारतासाठी धोका बनलाय चीन, हा 'खास' मित्र लवकरच देणार 33 फायटर जेट

पेंगाँग सरोवराचा प्रश्न गंभीर -
पेंगाँग त्सोच्या उत्‍तरेकडील काठावर भारत आणि चीनदरम्यान जी झटापट झाली ती अत्यंत गंभीर आहे. जवळपास 13,900 फूट उंचावर चांगलाजवळ 5-6 मेरोजी दोन्हीकडचे जवान एकमेकांच्या समोर आले होते. तेव्हापासून चीनी सैनिक भारतीय जवानांना फिंगर 4च्या पूर्वेकडे जाण्यापासून रोखत आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, "भारतीय लष्कराचे सर्व नकाशे स्पष्ट करतात, की LAC फिंगर 9वर उत्‍तरेपासून दक्षिणेकडे जाते. फिंगर 3 आणि 4 दरम्यान अनेक वर्षांपासून आयटीबीपीची पोस्ट आहे. मात्र, गेल्या महिन्यापासून तेथील फिंगर 4 आणि 8दरम्यान चीनने जो कब्जा केला आहे, त्यावर चर्चा करण्यास PLA नकार देत आहे."

India China Face Off : सुखोई ते मिराज, चीनचा सामना करण्यासाठी भारतानं तैनात केली शक्तीशाली लढाऊ विमानं

अशी आहे भारताची मागणी -
ज्या ठिकानांसंदर्भात दोन्ही देशांची भूमिका भिन्न आहे. अशा ठिकानांवरून चीनने मागे हटावे, असे भारताने स्पष्ट केले आहे. एप्रिलपूर्वी जी स्थिती होती तीच स्थिती भारताला हवी आहे. यासाठी चीनला पेंगाँग त्सोमधील आपले अनेक स्‍ट्रक्‍चर्स आणि बंकर्स नष्ट करावे लागतील. याला वेळ लागू शकतो.

India and china standoff : भारतीय लष्कराने करार तोडला, सैनिकांवर केला हल्ला; आता चीन करतोय भलताच दावा!

 

Web Title: India China Face Off China soldiers occupying 8km stretch of Pangong tso in Ladakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.