'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान भारताने पाकिस्तानच्या अणु ठिकाणावर केला होता हल्ला; टॉम कूपर म्हणाले, 'पुरावा आहे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 11:58 IST2026-02-18T11:44:17+5:302026-02-18T11:58:14+5:30

कूपर यांच्याकडे हल्ल्याची खात्री करणारे अनेक पुरावे आहेत. या हल्ल्याची वेळ आणि पद्धत हे दाखवते की त्यामागचा उद्देश केवळ शत्रूला रणनीतिक संदेश देणे होता.

India attacked Pakistan's nuclear site during 'Operation Sindoor'; Tom Cooper said, 'There is proof..." | 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान भारताने पाकिस्तानच्या अणु ठिकाणावर केला होता हल्ला; टॉम कूपर म्हणाले, 'पुरावा आहे..."

'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान भारताने पाकिस्तानच्या अणु ठिकाणावर केला होता हल्ला; टॉम कूपर म्हणाले, 'पुरावा आहे..."

भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या तणावाबाबत एक खळबळजनक दावा समोर आला आहे. प्रसिद्ध विमानचालक इतिहासकार आणि विश्लेषक टॉम कूपर यांनी भारतीय हवाई दलाने 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यानपाकिस्तानच्या किराना हिल्स येथे असलेल्या अणु सुविधा केंद्रावर हल्ला केला होता असा दावा केला आहे. या दाव्याच्या समर्थनार्थ त्यांच्याकडे पुरावे देखील उपलब्ध असेही त्यांनी म्हटले आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत, कूपर यांनी आपली भूमिका कायम ठेवली आणि सांगितले की त्यांच्याकडे हल्ल्याचे पुरावे आहेत. हल्ल्याची वेळ आणि पद्धत दर्शवते की त्यांचा उद्देश केवळ शत्रूला एक धोरणात्मक संदेश पाठविणे होता.

Ahilyanagar Crime: कैऱ्या कापायच्या अडकित्त्यानेच आईची हत्या, मृतदेहाशेजारी खेळत बसला गोट्या; तासभर सुरू होता...

किराना हिल्ससारख्या ठिकाणी हल्ला करणे म्हणजे लक्षणीय नुकसान न करता स्पष्ट संदेश देणे. त्यांच्या मते, भारताचा संदेश साधा आणि स्पष्ट होता. "पाकिस्तान, ऐका, आम्ही जेव्हाही, जिथेही आणि आम्हाला पाहिजे तितका दारूगोळा देऊन तुमचे मोठे नुकसान करू शकतो. आता पुरे झाले." , असा स्पष्ट संदेश दिला होता.  हा हल्ला पाकिस्तानी नेतृत्वाला त्यांच्या मर्यादा लक्षात आणून देण्यासाठी एक इशारा होता.

टॉम कूपर यांनी या विषयावर आपले मत व्यक्त करण्याची ही पहिलीच वेळ नाही. ऑपरेशन सिंदूर दरम्यान, कूपर यांनी फेसबुक पोस्टमध्ये भारतीय संरक्षण जनसंपर्क वर टीका केली आणि विचारले की ते किराना हिल्सजवळील कथित हल्ल्याची कबुली का देत नाहीत.

हवाई दलाच्या कामगिरीवर टीका करताना कूपर यांनी लिहिले, "भारत आणि भारतीय हवाई दलाचे जनसंपर्क कार्य आश्चर्यकारक आहे. व्हाईस एअर चीफ मार्शल नागेश कपूर यांनी एक पत्रकार परिषद घेतली तिथे कोणीतरी त्यांना '८८ तासांच्या युद्धादरम्यान १० मे २०२५ रोजी किराणा हिल्समधील पाकिस्तानच्या प्रमुख शस्त्रास्त्र साठवणुकीच्या सुविधांपैकी एकावर भारतीय हवाई दलाच्या हवाई हल्ल्यांबद्दल विचारले."

कूपर यांच्या मते, कूपर यांनी क्लासिक इंडियन एअर फोर्स स्टाईलमध्ये उत्तर दिले. "आम्हाला याबद्दल माहिती नाही. हे व्हिडीओ त्यांच्या लोकांनी सादर केले होते. त्यांनी ते तयार केले होते. आम्ही काहीही केले नाही, असेही कूपर म्हणाले.

Web Title : 'ऑपरेशन सिंदूर' में भारत ने पाकिस्तान के परमाणु स्थल पर हमला किया: टॉम कूपर

Web Summary : विश्लेषक टॉम कूपर का दावा है कि भारत ने 'ऑपरेशन सिंदूर' के दौरान किरना हिल्स स्थित पाकिस्तान के परमाणु ठिकाने पर हमला किया था, जिसके उनके पास सबूत हैं। उनका कहना है कि हमले का उद्देश्य एक रणनीतिक संदेश भेजना था, जिसमें पाकिस्तान को कभी भी, कहीं भी महत्वपूर्ण नुकसान पहुंचाने की भारत की क्षमता की चेतावनी दी गई थी, और उन्हें अपनी सीमाओं को स्वीकार करने के लिए कहा गया था।

Web Title : India Attacked Pakistan's Nuclear Site During 'Operation Sindoor': Tom Cooper Claims

Web Summary : Analyst Tom Cooper claims India attacked Pakistan's nuclear facility at Kirana Hills during 'Operation Sindoor', possessing proof. He asserts the attack aimed to send a strategic message, warning Pakistan of India's capacity to inflict significant damage anytime, anywhere, urging them to acknowledge their limitations.