शहरं
Join us  
Trending Stories
1
तत्कालीन सीजेआय लाडक्या कर्मचाऱ्यांवर मेहेरबान, सहा सहावेळा इन्क्रीमेंट दिली; सर्वोच्च न्यायालयात नेमके चाललेय तरी काय...
2
जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार
3
Kandivali Crime: कांदिवलीत गुंडांचा माज! कॉलर पकडली, वर्दी खेचत पोलिसांना मारहाण; कशामुळे झाला राडा?
4
सिडनी हल्ल्याला नवं वळण, पाकिस्तानी कनेक्शन आलं समोर; दहशतवादी बाप-लेकानं मिळून केला गोळीबार
5
'धुरंधर' अक्षय खन्नाच्या सावत्र आईची प्रतिक्रिया; म्हणाली, "मी कधीच त्याची आई झाले नाही कारण..."
6
काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे...
7
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
8
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
9
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
10
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
11
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
12
'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
13
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
14
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
15
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
16
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
17
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
18
विरार-अलिबाग कॉरिडॉर सहा जोडण्यांद्वारे महानगरांना कनेक्ट करणार; ७५ हेक्टरवरील ५०४३ खारफुटी बाधित होणार
19
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
20
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
Daily Top 2Weekly Top 5

न्यायव्यवस्था धोक्यात, लैंगिक छळाच्या आरोपांमागे मोठं कारस्थान; सरन्यायाधीशांची चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 13:19 IST

पुढील आठवड्यापर्यंत सुप्रीम कोर्टात महत्त्वपूर्ण प्रकरणांवर सुनावणी होणार आहे. त्यामुळे जाणूनबूजून माझ्यावर असले आरोप लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं रंजन गोगोई यांनी सांगितलं आहे

नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी त्यांच्यावर झालेले लैंगिक आरोपाचं खंडन करत न्यायव्यवस्था धोक्यात असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. पुढील आठवड्यापर्यंत सुप्रीम कोर्टात महत्त्वपूर्ण प्रकरणांवर सुनावणी होणार आहे. त्यामुळे जाणूनबूजून माझ्यावर असले आरोप लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं रंजन गोगोई यांनी सांगितलं आहे.  

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरोधात एका महिलेने सुप्रीम कोर्टाच्या 22 न्यायाधीशांना पत्र लिहून आपले लैंगिक छळाचा आरोप केला होता. या प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्या विशेष खंडपीठाने सुनावणी केली. यावेळी सरन्यायाधीशांनी प्रश्न उपस्थित करत म्हणाले की, मुख्य न्यायाधीश म्हणून 20 वर्ष मी केलेल्या सेवेचं हे बक्षिस आहे का? 20 वर्षानंतर आजही माझ्या खात्यात फक्त 6 लाख 80 हजार रुपये आहेत. एवढचं काय तर माझ्या सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्याकडेही माझ्याहून अधिक पैसे आहेत. माझ्यावर कोणीही आर्थिक आरोप करु शकत नाही म्हणून या प्रकारचा आरोप लावला जात आहे. न्यायव्यवस्थेला कोणीही बळीचा बकरा बनवू शकत नाही असंही गोगोई यांनी सांगितले.

 

या षडयंत्रामागे मोठ्या शक्तीचा हात  मुख्य सरन्यायाधीश यांनी पुढे असंही सांगितले की, या आरोपांमागे कोणी एक व्यक्ती नसून यामध्ये खूप जणांचा हात आहे. या षडयंत्रामागे मोठी शक्ती आहे. त्या लोकांना सरन्यायाधीशांचं कार्यालय निष्क्रिय असल्याचं दाखवून द्यायचं आहे. पुढील काळात महत्त्वपूर्ण प्रकरणांवर मी सुनावणी सुरुच ठेवणार आहे असं मी देशाच्या नागरिकांना आश्वस्त करतो. तसेच आता प्रकरण खूप पुढे निघून गेलं आहे. मी ज्या पदावर बसलो आहे त्या पदाला न्याय देण्यासाठी मी माझं सर्वस्व पणाला लावेन असं मुख्य सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी स्पष्ट केलं. 

दरम्यान शनिवारी या मुद्द्यावर सुनावणी करण्यात आली. यामध्ये न्यायव्यवस्थेचं स्वातंत्र्य यावरही चर्चा झाली. मुख्य सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखाली एका खंडपीठामध्ये याची सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी महाधिवक्ता तुषार मेहता यांनी रंजन गोगोई यांच्यावर केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपाबाबत अधिकाऱ्यांना सांगितले. 

 

सुप्रीम कोर्टाचे महासचिव संजीव सुधाकर कलगावकर यांनी सांगितले की, महिलेकडून लावण्यात आलेले आरोप दुर्दैवी आणि निराधार असल्याचं स्पष्ट केलं. तर न्यायाधीश अरुण मिश्रा यांनी न्यायव्यवस्थेवर लोकांचा असणारा विश्वास पाहता न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याला घेऊन चिंता व्यक्त केली. अशाप्रकारच्या आरोपांमुळे न्यायव्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास उडेल असंही सांगितले. 

त्यांनी मला कवेत घेतलं, सरन्यायाधीश गोगईंवर लैंगिक शोषणाचे आरोप

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयsexual harassmentलैंगिक छळIndiaभारत