They took me back, accused of sexual exploitation in the Chief Justice of Gogai | त्यांनी मला कवेत घेतलं, सरन्यायाधीश गोगईंवर लैंगिक शोषणाचे आरोप
त्यांनी मला कवेत घेतलं, सरन्यायाधीश गोगईंवर लैंगिक शोषणाचे आरोप

नवी दिल्ली - सरन्यायाधीश रंजन गोगई यांनी आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. विशेष म्हणजे संबंधित महिला रंजन गोगई यांची सर्वोच्च न्यायालयात असताना सहकारी राहिलेली आहे. या महिलेने 22 न्यायाधीशांना प्रतिज्ञापत्र लिहून गोगई यांच्यावर हे खळबळजनक आरोप केले आहेत. मात्र, गोगई यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. 

सरन्यायाधीस रंजन गोगई यांनी त्यांच्या राहत्या घरी 11 आणि 11 ऑक्टोबर 2018 रोजी माझ्यासोबत लैंगिक शोषण केल्याचा दावा 35 वर्षीय महिलेनं केला आहे. या महिलेनं 19 शुक्रवार एप्रिल रोजी 22 न्यायाधीशांना पत्र लिहून याबाबत माहिती दिली. गोगई यांनी मला कवेत घेऊन घट्ट आवळलं, नको तिथं स्पर्श केला. मी कशीबशी तेथून स्वत:ची सुटका करुन घेतली, असे पीडित महिलेनं आपल्या पत्रात म्हटलं आहे. मात्र, गोगई यांच्या सचिवांनी एका ई-मेलद्वारे हे आरोप फेटाळून लावले आहेत. संबधित महिला 2016 ते 2018 या 2 वर्षांच्या कालावधीत न्यायाधीश गोगई यांच्या ज्युनिअर असिस्टंट होत्या. मात्र, त्यांनी लावलेले आरोप अत्यंत घाणेरडे आणि तथ्यहीन असल्याचं गोगई यांनी ई-मेलद्वारे म्हटले आहे.  

 


Web Title: They took me back, accused of sexual exploitation in the Chief Justice of Gogai
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.