शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

रॉबर्ट वाड्रांकडील 'ते' ४२ कोटी प्राप्तिकर खात्याच्या रडारवर; नोटीस पाठवली!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2018 7:02 PM

बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी सोनिया गांधींचे जावई अडचणीत 

नवी दिल्ली: माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आले आहेत. वाड्रा यांच्याकडे असणाऱ्या 42 कोटी रुपयांच्या बेहिशोबी रकमेप्रकरणी त्यांना प्राप्तिकर विभागानं नोटीस पाठवली आहे. याप्रकरणी वाड्रा यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी 30 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. रॉबर्ट वाड्रा यांचं बेहिशोबी रक्कम प्रकरण स्कायलाईट हॉस्पिटॅलिटीशी संबंधित आहे. यामध्ये वाड्रा यांची 99 टक्के मालकी आहे. वाड्रा यांनी या प्रकरणातील आदेशांना उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. मात्र दोन्ही न्यायालयांनी त्यांची याचिका फेटाळून लावली. 'माझी कंपनी लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिपमध्ये होती. मात्र प्राप्तिकर विभागानं दिलेल्या नोटिशीमध्ये या कंपनीचा उल्लेख प्रायव्हेट लिमिटेड पार्टनरशिप असा करण्यात आला आहे,' असं वाड्रा यांनी याचिकेत नमूद केलं होतं. गेल्या वर्षी या प्रकरणात सक्तवसुली संचलनालयानं जयप्रकाश बागरवा आणि अशोक कुमार यांना अटक केली होती. अशोक कुमार स्कायलाईट हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेडचे महेश नागर यांचे निकटवर्तीय आहेत. बागरवा आणि कुमार यांनी पीएमएलए अंतर्गत अटक करण्यात आली होती. यानंतर या दोघांची चौकशी करण्यात आली. स्कायलाईट हॉस्पिटॅलिटीकडून बिकानेरमध्ये चार जमीन खरेदीचे व्यवहार झाले. यामध्ये नागरच स्कायलाईट हॉस्पिटॅलिटीचा अधिकृत प्रतिनिधी होता.  

टॅग्स :robert vadraरॉबर्ट वाड्राcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी