शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकाचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
2
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
3
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
4
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
5
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
6
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
7
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
8
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
9
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
10
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
11
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
12
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
13
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
14
VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा
15
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
16
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
17
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
18
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
19
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शहरात भरदिवसा घरफोडी मुक्ताईनगर कॉलनीतील घटना : ३४ हजाराचा ऐवज लांबविला

By admin | Updated: January 22, 2016 00:10 IST

फोटो

फोटो
जळगाव : चोरी व घरफोडीचे सत्र पुन्हा सुरू झाले असून गुरुवारी मुक्ताईनगर कॉलनीत भरदिवसा जयंत रामदास पेठकर (वय ४५) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रक्कम व दागिने असा मिळून ३३ हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पेठकर हे व्यापारी तर त्यांच्या पत्नी नलिनी या शिक्षिका आहेत. पेठकर गुरुवारी सकाळी साडे आठ वाजता व्यापारानिमित्त बाहेर गावी गेले होते तर त्यांच्या पत्नी या पावणे सात वाजताच शाळेत गेल्या होत्या. दोघं मुलही शाळेतच होते. नलिनी पेठकर या दुपारी पावणे दोन वाजता शाळेतून घरी आल्या असता घराला कुलूप नव्हते,फक्त कडी लावलेली होती. घरात प्रवेश केल्यावर कपाटात उघडे होते व त्यातील सामान जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेला होता. त्यावरुन घरात चोरी झाल्याचा अंदाज नलिनी यांना आला. कपाटात ठेवलेले साडे सोळा हजार रुपये रोख, चार हजार रुपये किमतीचे दहा ग्रॅमचे चांदीचे अकरा दागिने, तेरा हजार ३३० रुपये किमतीचे पाच ग्रॅमची साखळी व एक ग्रॅमचा शिक्का गायब झालेला दिसला. त्यांनी हा प्रकार पती जयंत यांना सांगितला. घरात चोरी झाल्याची माहिती जिल्हा पेठ पोलिसांना कळविल्यानंतर पोलीस निरीक्षक श्याम तरवाडकर, उपनिरीक्षक सुप्रिया देशमुख, गुन्हे शाखेचे राजू मेंढे, रवी नरवाडे, अल्ताफ पठाण आदींनी घटनास्थळावर भेट देऊन पाहणी केली. परिसरातील नागरिकांकडून माहिती जाणून घेतली. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले.