हलकर्णीत दिशा संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन

By Admin | Updated: May 10, 2014 19:41 IST2014-05-10T19:41:36+5:302014-05-10T19:41:36+5:30

Inauguration of the Office of the Directorate of Halkani | हलकर्णीत दिशा संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन

हलकर्णीत दिशा संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन

>चंदगड :
हलकर्णी (ता. चंदगड) येथे दिशा स्वयंसेवी संस्थेतर्फे नव्याने सुरू केलेल्या कार्यालयाचे उद्घाटन प्रा. डॉ. नवनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. संस्थेचे मूळ कार्यालय सदावरवाडी येथे आहे.
संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती विद्या तावडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
डॉ. शिंदे म्हणाले, जीवनामध्ये काहीतरी नवीन करणारी माणसेच मेल्यानंतरही आपली छाप लोकांच्या मनात ठेवून जातात. चांगले काम करताना संकटे ही येणारच त्यांना न घाबरता त्यातून नवनिर्मिती केली पाहिजे. कायद्याने स्त्रियांना ५० टक्के आरक्षण दिले आहे. त्याचा लाभ घेऊन स्वत:ची प्रगती करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कॉ. संपत देसाई यांनी केवळ सेवेतून समाज बदलणे शक्य नसून, त्यासाठी समाजप्रबोधनाची गरज आहे. स्त्रियांचे प्रश्न राजकारणांशी संबंधित असल्याने त्यांच्या माध्यमातून संस्थेच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
यावेळी एम. डी. कांबळे, स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष नितीन पाटील, संजय पाटील, बेबी फेमीस्टार यांनी मनोगत व्यक्त केले.
गटप्रमुख दिलशान शेख, अनिता गावडे, मेरी फर्नांडिस, ज्युली फर्नांडिस, डॉ. जी. एस. पाटील, सतीश सबनीस, राजू व्हटकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होेते. (प्रतिनिधी)

Web Title: Inauguration of the Office of the Directorate of Halkani