३ माजी आमदारांसह ६ नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 22:28 IST2026-03-28T22:27:26+5:302026-03-28T22:28:00+5:30

काँग्रेस पक्षात सामील झालेले माजी आमदार राजकुमार ठुकराल यांनी भाजपाच्या तिकिटावर दोनदा रुद्रपूरमधून आमदार म्हणून काम केले आहे

In Uttrakhand, 6 leaders including 3 former MLAs join Congress; BJP in shock before assembly elections | ३ माजी आमदारांसह ६ नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला धक्का

३ माजी आमदारांसह ६ नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला धक्का

देहरादून  - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंडमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. निवडणुकीपूर्वी नेत्यांची पक्षांतरे वाढली आहेत. रुद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे दोन वेळा आमदार राहिलेले राजकुमार ठुकराल यांच्यासह सहा भाजपा नेत्यांनी आज काँग्रेसच्याउत्तराखंड प्रभारी कुमारी सेलजा यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 

या पक्षांतरामुळे उत्तराखंडच्या राजकारणातील मोठी घडामोड घडली आहे. या नेत्यांचा काँग्रेसमधील प्रवेश हा आगामी उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे संख्याबळ वाढवण्याचा प्रयत्न म्हणून पाहिला जात आहे. या नेत्यांच्या मदतीने काँग्रेस अनेक विधानसभा जागांवरील आपली पकड मजबूत करण्यासाठी काम करत आहे.

राजकुमार ठुकराल कोण आहेत?

काँग्रेस पक्षात सामील झालेले माजी आमदार राजकुमार ठुकराल यांनी भाजपाच्या तिकिटावर दोनदा रुद्रपूरमधून आमदार म्हणून काम केले आहे. ठुकराल हे एक खंबीर नेते मानले जातात. त्यांनी २०१२ आणि २०१७ मध्ये भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली. २०२२ मध्ये तिकीट नाकारल्यानंतर ठुकराल यांनी बंड केले आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले.राजकुमार ठुकराल यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यापूर्वी नगर परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम केले होते. त्यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकि‍र्दीमुळे माजी आमदार राजकुमार ठुकराल यांचा रुद्रपूर परिसरात मजबूत प्रभाव असल्याचे मानले जाते. त्यांच्या काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याबद्दल बऱ्याच काळापासून अटकळ होती, जी अखेर आज खरी ठरली.

दरम्यान, रुरकीचे माजी महापौर गौरव गोयल यांनीही काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. हरिद्वार जिल्ह्यात गोयल यांचे मोठे वर्चस्व आहे. त्यामुळे काँग्रेसने या पवित्र शहरातील विधानसभा जागा जिंकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सितारगंजचे बहुजन समाज पक्षाचे दोन वेळा आमदार राहिलेले नारायण पाल यांनीही काँग्रेस पक्षात प्रवेश केला. २००७ आणि २०१२ मध्ये नारायण पाल यांनी सितारगंज विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून विजय मिळवला होता. २०२२ मध्ये त्यांनी बसपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती पण त्यात त्यांचा पराभव झाला. त्याचप्रमाणे भीमलाल आर्य यांनी २०१२ आणि २०१७ मध्ये घणसालीमधून भाजपाचे आमदार म्हणून काम केले. मात्र २०१६ पासून ते काँग्रेसच्या जवळ राहिले होते.

Web Title : उत्तराखंड: 3 पूर्व विधायकों समेत 6 नेता कांग्रेस में, भाजपा को झटका।

Web Summary : उत्तराखंड चुनाव से पहले, भाजपा और बसपा के तीन पूर्व विधायकों सहित छह नेता कांग्रेस में शामिल हुए। इससे कांग्रेस की स्थिति मजबूत होती है, खासकर रुद्रपुर और हरिद्वार में, जिसका उद्देश्य आगामी चुनावों में अधिक सीटें जीतना है।

Web Title : Ex-MLAs, leaders join Congress; BJP setback before Uttarakhand elections.

Web Summary : Ahead of Uttarakhand polls, six leaders, including three ex-MLAs from BJP and BSP, joined Congress. This strengthens Congress's position, especially in Rudrapur and Haridwar, aiming to win more seats in the upcoming elections.