आई-वडील झोपायचे टेरेसवर; घरात भाऊ ११ वर्षाच्या सख्ख्या बहिणीवरच करायचा बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2024 13:35 IST2024-08-25T13:27:02+5:302024-08-25T13:35:02+5:30
Rape Case Updates: रात्रीच्या वेळी आईवडील घरात नसताना अल्पवयीन भावाने बहिणीलाच वासनेची शिकार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन वर्षांपासून भाऊ बहिणीवर अत्याचार करत होता. पीडिता आजारी पडल्याने ही घटना समोर आली.

आई-वडील झोपायचे टेरेसवर; घरात भाऊ ११ वर्षाच्या सख्ख्या बहिणीवरच करायचा बलात्कार
Rape Crime Latest News: १६ वर्षाच्या भावाने ११ वर्षांच्या सख्ख्या बहिणीवरच असंख्य वेळा बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ११ वर्षांची पीडिता आजारी पडल्यानंतर रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर हे उघडकीस आले. या प्रकरणी पोलिसांनी नराधम भावाला ताब्यात घेतले. दोन वर्षांपासून भाऊ बहिणीवर अत्याचार करत होता, अशी माहितीही चौकशीतून समोर आली आहे.
तामिळनाडूतील विल्लुपुरम जिल्ह्यातील जिंन्जीजवळ असलेल्या एका गावात ही भावा बहिणीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे.
तपासणीनंतर आईवडिलांना बसला धक्का
पीडित मुलगी आजारी पडली होती. तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली असता, ती चार महिन्यांची गर्भवती असल्याचे आढळून आले. हे कळल्यानंतर पीडितेच्या आईवडीलांनाही धक्काच बसला.
तक्रारीतील माहितीनुसार, पीडित मुलीचे आईवडील हे मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. आईवडील नेहमी घराच्या छतावर झोपायचे, तर पीडिता आणि तिचा सख्खा भाऊ हे घरात झोपायचे. मागील दोन वर्षांपासून आरोपी बहिणीवर रात्री अत्याचार करत होता.
...अन् भावाकडून होत असलेल्या अत्याचाराला फुटली वाचा
आपल्या मुलीवर मुलगाच अत्याचार करत असल्याची माहिती पालकांना नव्हती. पण, पीडित मुलगी आजारी पडली. तिला रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर ती गर्भवती असल्याचे कुटुंबीयांना कळले. पीडित मुलीला पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी पोक्सो कायद्यातील कलमान्वये गुन्हा दाखल करून अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे.