शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
2
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
6
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
7
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
8
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
9
स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात दाखल 
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

तीन मुले पण...! मुलगी न झाल्यानं पतीनं दिला घटस्फोट; पत्नी म्हणते, "आमची आर्थिक स्थिती..."

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 12:42 PM

मुलगी न झाल्यानं घटस्फोट दिल्याची अनोखी घटना उघडकीस आली आहे.

घरगुती वाद, पती-पत्नीमधील कलह किंवा एखाद्या वाईट व्यसनामुळे घटस्फोट झाल्याची अनेक उदाहरणं आहेत. मात्र, मुलगी न झाल्यानं घटस्फोट दिल्याची अनोखी घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशातीलआग्रा शहरातील या घटनेनं सर्वाच्याच भुवया उंचावल्या. खरं तर पत्नीनं सलग तीन मुलांनाच जन्म दिल्यानं पतीनं घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. अनेकदा मुलगी झाल्यावर महिलांना कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडावं लागतं. असं लाजिरवाणं कृत्य अनेकदा समोर आलं आहे.

मुलगी झाल्यामुळं घरात वाद झाल्याचंही पाहायला मिळालं आहे. पण, आग्रा येथील एका व्यक्तीनं पत्नी फक्त मुलांना जन्म दिल्याने नाराज होत घटस्फोट दिला. त्याला मुलगी हवी होती. उत्तर प्रदेशातील आग्रा येथून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं संबंधित व्यक्तीला मुलगी हवी यावरून पती-पत्नीमध्ये भांडण झालं होतं, परंतु सलग तीन मुलं झाल्यानंतर पत्नीनं पुढचे मूल जन्माला घालण्यास नकार दिला अन् पतीचा राग अनावर झाला. 

पती-पत्नीमधील वाद चिघळलापत्नीचं म्हणणं आहे की, घरची आर्थिक परिस्थिती चांगली नाही आणि चौथे अपत्य झाल्यास खर्चाचा मेळ कसा बसेल. तसेच पुन्हा एकदा मुलगा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावरून पती-पत्नीमधील वाद इतका खोलवर गेला की तो आग्रा येथील कुटुंब समुपदेशन केंद्रापर्यंत पोहोचला. याप्रकरणी स्थानिक शहागंज पोलिसांनी एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.

१० वर्षांपूर्वी झालं होतं लग्न...आग्रा येथील या जोडप्याचं १० वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. त्यांना तीन मुलं आहेत, पण मुलगी होत नसल्यानं पती नाराज आहे. मुलगी न झाल्यानं पतीनं पत्नीला सोडलं आहे. यानंतर पीडितेनं कौटुंबिक समुपदेशन केंद्र गाठलं, तिथं समुपदेशकातर्फे पती-पत्नी यांना समज देण्यात आली. परंतु संभाषणातून काही तोडगा निघाला नाही.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशagra-pcआग्राmarriageलग्न