शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

"काँग्रेसने मला मंत्री बनवले नाही, हे एका अर्थाने चांगलेच झाले"; रामदास आठवलेंची राज्यसभेत फटकेबाजी, UPA ला लगावला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 17:38 IST

Ramdas Athawale Rajya Sabha Speech: राज्यसभेत रामदास आठवले यांनी काँग्रेस आणि UPA वर निशाणा साधला. "तिकडे ५ वर्षे राहिलो असतो, इथे १३ वर्षे मंत्री आहे" असे म्हणत त्यांनी राजकीय टोलेबाजी केली.

नवी दिल्ली: संसदेत सध्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील 'धन्यवाद प्रस्तावा'वर चर्चा सुरू आहे. या चर्चेदरम्यान केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे  अध्यक्ष रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत भाषण करत सभागृहात हास्यलहरी निर्माण केल्या. "काँग्रेसने मला मंत्री बनवले नाही, हे एका अर्थाने चांगलेच झाले," असे विधान करत त्यांनी यूपीए सरकारच्या काळातील आठवणींना उजाळा दिला.

आठवले यांनी सांगितले की, ते पूर्वी काँग्रेससोबत होते आणि सामाजिक न्यायाच्या प्रश्नांसाठी वारंवार तत्कालीन मंत्र्यांना भेटायचे. "काँग्रेसने काहीच केले नाही असे नाही, पण जेवढे करायला हवे होते तेवढे केले नाही," अशी खंत त्यांनी व्यक्त केली. पुढे मिश्किलपणे ते म्हणाले, "मी तेव्हा यूपीएसोबत होतो. जर त्यांनी मला तेव्हाच मंत्री बनवले असते, तर मी आज इकडे (NDA कडे) आलो नसतो. त्यांनी मला मंत्री बनवले नाही, हे माझ्यासाठी चांगलेच ठरले. तिथे राहिलो असतो तर ५ वर्षे मंत्री राहिलो असतो, पण इकडे मी गेल्या १३ वर्षांपासून मंत्री आहे."

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष काँग्रेस यांच्यात 'तू-तू मैं-मैं' पाहायला मिळाली. राज्यसभेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी लोकसभेतील मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेतला. यावरून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि खर्गे यांच्यात "कोणी कोणाला बंधक बनवले आहे?" यावरून जोरदार शाब्दिक युद्ध रंगले.

नड्डांचा 'अबोध बालक' टोलाराज्यसभेत बोलताना जे. पी. नड्डा यांनी कोणाचेही नाव न घेता राहुल गांधींवर निशाणा साधला. ते म्हणाले, "तुमच्या पक्षाला एका 'अबोध बालका'चा (अजाण बालक) बंधक बनवू नका. लोकशाहीत लोकशाहीच्या मार्गाने काम व्हायला हवे. तुम्ही तुमचा पक्ष स्वतंत्रपणे चालवा, पण एका व्यक्तीच्या हट्टापायी संपूर्ण पक्षाला वेठीस धरू नका."

खर्गेंचे "मोदींचे बंधक" प्रत्युत्तर

नड्डांच्या या टीकेला मल्लिकार्जुन खर्गे यांनी तात्काळ प्रत्युत्तर दिले. "आम्हाला सल्ला देण्यापेक्षा स्वतःकडे पहा. पंतप्रधान मोदींनी तुम्हाला 'बंधक' बनवले आहे. त्यांच्या परवानगीशिवाय तुम्ही साधे अक्षरही बोलू शकत नाही," असा टोला खर्गे यांनी लगावला.

English
हिंदी सारांश
Web Title : Ramdas Athawale's jibe at UPA in Rajya Sabha: A blessing in disguise.

Web Summary : Ramdas Athawale humorously stated in Rajya Sabha that Congress not making him a minister was a blessing. He reminisced about his time with UPA, adding he might not have joined NDA if they had. He has been a minister for 13 years now.
टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेBJPभाजपाcongressकाँग्रेसRajya Sabhaराज्यसभाBudget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशन