धक्कादायक! 'क्रिश' चित्रपट पाहून विद्यार्थ्याने शाळेच्या पहिल्या मजल्यावरुन मारली उडी, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 14:13 IST2023-07-22T14:12:17+5:302023-07-22T14:13:03+5:30

हृतिक रोशनच्या क्रिश चित्रपटाने प्रभावित झाला होता, त्यामुळे त्याने उडी मारल्याचं म्हटलं जात आहे.

imitating krrish third class student injured by jumping from first floor of school in kanpur | धक्कादायक! 'क्रिश' चित्रपट पाहून विद्यार्थ्याने शाळेच्या पहिल्या मजल्यावरुन मारली उडी, म्हणाला...

धक्कादायक! 'क्रिश' चित्रपट पाहून विद्यार्थ्याने शाळेच्या पहिल्या मजल्यावरुन मारली उडी, म्हणाला...

उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने शाळेच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा विद्यार्थी हृतिक रोशनच्या क्रिश चित्रपटाने प्रभावित झाला होता, त्यामुळे त्याने उडी मारल्याचं म्हटलं जात आहे. यामध्ये विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून विद्यार्थ्यावर सध्या उपचार सुरू आहेत. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचे फुटेज समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बाबू पुरवा येथील अनिल सी कॉलनीत राहणाऱ्या एका व्यावसायिकाचा मुलगा वीरेन स्वरूप हा शाळेत तिसरीच्या वर्गात शिकतो. बुधवारी तो पाणी पिण्याच्या बहाण्याने वर्गाबाहेर आला आणि त्याने रेलिंगवरून खाली उडी मारली. हृतिक रोशनचा क्रिश चित्रपट पाहून त्याने हा स्टंट केल्याचे बोलले जात आहे. 15 फूट उंचीवरून उडी मारल्याने विद्यार्थ्याच्या नाकाला, पायाला व हाताला जखमा झाल्या.

जखमी विद्यार्थ्याने आईला सांगितले की, त्याला क्रिश चित्रपटातील सुपरहिरो आवडला आहे. त्याला सुपर हिरोसारखे स्टंट करायचे होते कारण उंचीवरून उडी मारल्यानंतर सुपर हिरो सरळ त्याच्या पायावर उभा राहतो. मात्र यामध्ये विद्यार्थ्याला दुखापत झाली आहे. सर्वांनाच धक्का बसला आहे. 

वीरेनसोबत आणखी तीन ते चार विद्यार्थी होते. विद्यार्थ्याने त्याच्या साथीदारांनाही उडी मारण्यास सांगितले होते. हे ऐकून बाकीचे विद्यार्थी परतले, मात्र त्यांनी त्याला उडी मारण्यास प्रवृत्त केले. प्रिन्सिपल नंदिता माळी यांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्याने स्वतःहून उडी मारली होती. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: imitating krrish third class student injured by jumping from first floor of school in kanpur