शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

मी शेतकरी विरोधी नाही -पंतप्रधान

By admin | Updated: March 5, 2015 23:47 IST

वादग्रस्त भू-संपादन विधेयकाला विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जोरदार टीका केली़ सरकार शेतकरीविरोधी असल्याचा विरोधकांचा आरोप त्यांनी यावेळी खोडून काढला़

खंडवा (मप्ऱ) : वादग्रस्त भू-संपादन विधेयकाला विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जोरदार टीका केली़ सरकार शेतकरीविरोधी असल्याचा विरोधकांचा आरोप त्यांनी यावेळी खोडून काढला़येथील श्रीसिंगाजी औष्णिक विद्युत प्रकल्पाच्या प्रत्येकी ६०० मेगावॅटच्या दोन युनिटच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी मोदी बोलत होते़ नवे भूसंपादन विधेयक आणले म्हणून मी शेतकरीविरोधी असल्याचा कांगावा विरोधक करीत आहेत़ पण मी शेतकरीविरोधी नाही़ मी स्वत: वा माझ्या सरकारने कधीही शेतकऱ्यांचा विरोध केलेला नाही़ आधीच्या संपुआ सरकारने पारित केलेल्या भूसंपादन कायद्यात शाळा, रुग्णालय, निवास, पाणी आणि सिंचन प्रकल्पासाठीची कुठलीही तरतूद केली गेलेली नव्हती़ आम्ही ही तरतूद आणू इच्छितो़ विरोधकांच्या अर्थपूर्ण सूचना वा सुधारणाही आम्ही स्वीकारायला तयार आहोत़ मात्र यावर विरोधक गप्प बसले आहेत, असे मोदी म्हणाले़आपल्या भाषणात मोदींनी अर्थसंकल्पाची प्रशंसा केली़ अर्थसंकल्पात सरकारने समाजातील सर्व वर्गांच्या कल्याणासाठी विविध तरतुदी केल्या आहेत़ गरीब, शेतकरी, दलित, आदिवासी सर्वांना न्याय देण्याचे प्रयत्न केले, असे ते म्हणाले़ देशाच्या विकासासाठी वीज उत्पादन आवश्यक असल्याचे सांगत मोदींनी वीज वाचवण्याचे आवाहन केले़ वीज वाचेल तर कोळसा वाचले आणि कोळसा वाचेल तर देशाचे भविष्य सुरक्षित राहील़आजही देशातील २० टक्के लोकांपर्यंत वीज पोहोचलेली नाही़ हजारो गावात अद्यापही विजेचे खांब उभे नाहीत़ खांब आहेत तिथे विजेच्या तारा पोहोचलेल्या नाही़ या सर्वांपर्यंत वीज पोहोचवण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले़रालोआ सरकार सत्तेवर येताच गत ९ ते १० महिन्यांच्या कार्यकाळात वीज उत्पादनात ११ टक्के वाढ झाली असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला़ (वृत्तसंस्था)