शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आयआयटीयनसमोर आता राजकारणाचाही पर्याय

By admin | Updated: February 15, 2015 23:39 IST

असे आयआयटी खरगपूरमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्गाला असलेल्या अटल आशुतोष अग्रवाल या विद्यार्थ्याने म्हटले.

कोलकाता : आम आदमी पार्टीचे संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ज्या खरगपूरमधून आयआयटी झाले, त्या संस्थेतील विद्यार्थ्यांना आता कारकीर्द घडविण्यासाठी राजकारण प्रवेश हाही एक पर्याय वाटू लागला आहे. अनेकांनी केजरीवालांचा दिल्लीतील अभूतपूर्व विजय आम्हाला राजकारण प्रवेशासाठी प्रेरणादायी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.आयआयटी व अभियांत्रिकीची पार्श्वभूमी असलेले लोकही राजकारणात यशस्वी होऊ शकतात, हे केजरीवालांनी दाखवून दिले आहे, असे आयआयटी खरगपूरमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्गाला असलेल्या अटल आशुतोष अग्रवाल या विद्यार्थ्याने म्हटले.मूळचे दिल्लीकर असलेल्या केजरीवाल यांनी सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी लढ्यात सहभागी होत राजकारणात मिळविलेल्या यशामुळे आम्हाला राजकारण प्रवेशाचा मार्ग सोपा वाटत आहे, असे अटल याने म्हटले. त्याने यापूर्वीच आम आदमी पार्टीत प्रवेश केला आहे. जिओफिजिक्स दुसऱ्या वर्गाला असलेल्या लोकेश देशमुख याने आपच्या आॅनलाईन व फोनवरील प्रचाराला मदत केली. ‘आप’कडे ओढा देशातील सर्वोच्च इंजिनिअरिंग संस्थेपैकी एक असलेल्या आयआयटी खरगपूरच्या विद्यार्थ्यांचा आपमध्ये प्रवेश करण्याकडे कल वाढत आहे. केजरीवाल हे मूळचे खरगपूर कॅम्पसमधील असल्यामुळे आम्हाला त्यांच्याबद्दल आकर्षण आहे. ते आपल्यापैकीच एक असल्याची भावना आहे, असे लोकेशने म्हटले.झोपडपट्टी हटविल्याचा विरोधगाझियाबादच्या शाहदरा भागातील झोपडपट्टी हटविल्याच्या विरोधात शनिवारी शेकडो लोकांनी केजरीवाल यांच्या कोशांबी येथील निवासस्थानाबाहेर निदर्शने केली.‘पालिका अधिकाऱ्यांची ही क्रूरता आहे. त्यांनी आपल्या झोपड्या पाडल्या आणि आम्हाला बेघर केले. यावेळी त्यांनी आमचे सामान फेकून शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. त्यांनी लहान मुलांनाही सोडले नाही,’ असा आरोप निदर्शने करणाऱ्या ३० वर्षीय विजयवती हिने केला. तथापि, हे लोक सरकारी जागेवर झोपड्या बांधत असल्याने त्यांचे बांधकाम पाडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. (वृत्तसंस्था)