शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

पंतप्रधानांच्या नावे मोफत लॅपटॉप योजना फसवी; आयआयटी इंजिनिअरला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2019 10:36 AM

पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या तक्रारीनंतर सायबर सेलने राजस्थानच्या नागौरमधील पुडलोटा येथून दोघांना अटक केली आहे.

नवी दिल्ली : मेक इन इंडियाअंतर्गत वेबसाईट बनवून दोन कोटी तरुणांना मोफत लॅपटॉप देण्याची योजना फसवी निघाली असून आयआयटीचा इंजिनिअर राकेश जांगिड़ याला अटक करण्यात आली आहे. 

दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये त्याचा भाऊ निरंजन यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. दोघांनी बनावट वेबसाईट बनवून त्यावर मेक इंन इंडिया आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरला होता. 

पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या तक्रारीनंतर सायबर सेलने राजस्थानच्या नागौरमधील पुडलोटा येथून दोघांना अटक केली आहे. राकेश या वेबसाईटला लोकप्रिय करून त्याव्दारे पैसे कमवणार होता. तसेच या साईटवर रजिस्टर करणाऱ्या लोकांची माहिती विकण्याचाही राकेशचा कट होता. 

23 वर्षीय राकेश नागौर हा 2019 च्या बॅचचा आयआयटी पोस्ट ग्रॅज्युएट आहे. डीसीपी अन्वेश रॉय यांनी सांगितले की, तो एका हैदराबादच्या मोठ्या कंपनीमध्ये काम करत होता. त्याने Modi_loptop.wishguruji.com या नावाने वेबसाईट बनविली होती. यामध्ये केंद्रामध्ये भाजपाची दुसरे सरकार आल्यास दोन कोटी तरुणांना मोफत लॅपटॉप वाटण्याचे आणि त्यासाठी अर्ज करण्याचे सांगितले होते. पंतप्रधान मोदींचे नाव आणि मोफत लॅपटॉप मिळणाक या आशेपोटी दोन दिवसांत 15.2 लाख लोकांनी भेट दिली होती. तसेच 68000 क्लिकही मिळाले होते. या वेबसाईटच्या प्रचारासाठी त्याने इन्स्टाग्राम, यू-ट्यूब आणि व्हॉट्सअॅपचा वापर केला होता. 

अधिकाधीक लोकांना फसविण्यासाठी खोट्या योजनेचा प्रचार करण्यात आला. यामध्ये नंतर तीस लाख लोकांनी यशस्वीपणे अर्ज दाखल केले आहेत, आता तुमची वेळ आहे. अंतिम तारखेच्या आधी तुमचा अर्ज भरा, असे आवाहनही करण्यात आले होते. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMake In Indiaमेक इन इंडियाlaptopलॅपटॉपBJPभाजपा